Team India Sakal
क्रिकेट

IND vs BAN: भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य; बांगलादेशसमोर आज सीरिज वाचविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

India vs Bangladesh 2nd T20I: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केल्यानंतर पहिल्या टी-२० लढतीतही बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. आता नवी दिल्लीमध्ये याच दोन देशांमध्ये दुसरा टी-२० सामना रंगणार आहे.

याप्रसंगी भारतीय क्रिकेट संघ टी-२० मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर मैदानात उतरेल. बांगलादेशचा संघ मात्र टी-२० मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.

भारतीय संघ व्यवस्थापनाकडून बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

यामध्ये जसप्रीत बुमरा, रिषभ पंत व अक्षर पटेल यांचा समावेश आहे, मात्र तरीही ग्वाल्हेर येथील पहिल्या टी-२० लढतीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने सात विकेट राखून बांगलादेशवर मात केली. त्यामुळे बांगलादेशसाठी उद्याचा पेपरही सोपा नसणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांच्यावर सलामी फलंदाजांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल या प्रमुख सलामीवीरांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसन व अभिषेक शर्मा या दोघांनीही या संधीचा फायदा घ्यायला हवा. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने या मालिकेत ठसा उमटवायला हवा.

गोलंदाजी विभाग भक्कम

भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी बदल करेल, असे वाटत नाही. भारताचा गोलंदाजी विभाग भक्कम आहे. अर्शदीप सिंग आपली कामगिरी चोख बजावत आहे. मयंक यादवने पहिल्याच सामन्यात चमक दाखवली आहे.

नितीशकुमार रेड्डी, हार्दिक पंड्या यांच्याकडून अष्टपैलू कामगिरीची आशा बाळगली जात आहे. वॉशिंग्टन सुंदर व वरुण चक्रवर्ती या फिरकीवीरांमध्ये बांगलादेशच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याची क्षमता आहे.

नजमुलला आशा

बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो म्हणाला, पहिल्या टी-२० लढतीत आम्ही वाईट खेळलो असे म्हणणार नाही. आमचा संघ यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT