Virat Kohli 12000 runs at Home Sakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test : Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा मोडला मोठा विक्रम

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस भारतीयांनी गाजवला. बांगलादेशचा पहिला डावा २३३ धावांवर गुंडाळल्यानंतर फलंदाजांनी विक्रमांमागून विक्रम केले. वेगवान अर्धशतक, शतक, दीडशतक अन् द्विशतक असे कसोटीतील सर्व रेकॉर्ड्स आज भारतीय संघाने मोडले. त्यात Virat Kohli ने विश्वविक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर लोकेश राहुल व विराट कोहली यांनी आक्रमक फटकेबाजी केली. भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे.

बांगलादेशचा संघ २३३ धावांवर गडगडला. मोमिनूल हकने १९४ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह १०७ धावांची नाबाद खेळी केली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, आकाश दीप व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा ११ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या शुभमन गिलनेही ३६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावा केल्या. रिषभ पंत ( ९) ला धावांचा वेग वाढवण्यासाठी पाठवले गेले, परंतु त्याला शाकिब अल हसनने माघारी पाठवले.

यशस्वी जोरदार फटकेबाजी करत राहिला. पण, तो ५१ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह ७२ धावांची खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने १८.२ षटकांत १५० धावा फलकावर चढवल्या आणि त्या कसोटीतील वेगवान दीडशतकी धावा ठरल्या. भारताने २४.२ षटकांत २०० धावांचा टप्पा ओलांडला आणि हाही वर्ल्ड रेकॉर्ड आहे. विराटने ५९४ इनिंग्जध्ये आज २७००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला आणि सचिन तेंडुलकरचा ( ६२३ इनिंग्ज) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. कोहली ४४ धावांवर खेळतोय. त्याने ११४ कसोटीत ८८७१ धावा, २९५ वन डे सामन्यांत १३९०६ धावा आणि १२५ ट्वेंटी-२०त ४१८८ धावा केल्या आहेत.

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

ऑनलाइन फोन मागवला, ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी संपवले, मृतदेहाचे तुकडे करून फेकले, कारण काय?

Bigg Boss Marathi 5 : "अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन" ; त्या भांडणाचा राग घराबाहेर पडताच पॅडीनी केला व्यक्त , "घराबाहेर येताच..."

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

SCROLL FOR NEXT