IND vs BAN 2nd Test esakal
क्रिकेट

IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारतीय फलंदाजांनी आज बांगलादेशच्या गोलंदाजांना सोलून काढले. २३३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २८ षटकांत आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी भारताला ३.५ षटकांत ५५ धावांची सलामी दिली. यशस्वीने अर्धशतक झळकावले, शुभमन गिल, विराट कोहली हेही बरसले. विराटचे अर्धशतक थोडक्यात हुकले. KL Rahul ने आक्रमक खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले.

यशस्वीने ५१ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह ७२ धावांची खेळी केली. रोहितने ११ चेंडूंत २३ धावा चोपल्या. ऋषभ पंत ९ धावांवर झेलबाद झाला. शुभमनने ३९ धावांची खेळी केली. विराट कोहली व के. एल. राहुल यांनी ८५ धावांची भागीदारी केली. विराट ३५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४७ धावांवर शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पण, त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी इनिंग्जमध्ये २७,००० धावांचा विक्रम त्याने नोंदवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

  • ३४३५७ - सचिन तेंडुलकर (७८२ डाव)

  • 28016 - कुमार संगकारा (666 डाव)

  • २७४८३ - रिकी पाँटिंग (६६८ डाव)

  • 27012* - विराट कोहली (594 डाव)

  • २५९५७ - महेला जयवर्धने (७२५ डाव)

ऋषभ पंतने मागितली माफी...

दरम्यान, विराट कोहली आधीच बाद झाला असता आणि त्याला ऋषभ कारणीभूत ठरला असता. विराटने गोलंदाजाने टाकलेला चेंडू डिफेन्स केला आणि त्यानंतर एक धाव घेण्यासाठी पळाला... पण, नॉन स्ट्राइकर ऋषभने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि त्याचा निशाणा अचूक लागला असता तर विराट रन आऊट झाल असता..

पण, नशीब बलवत्तर म्हणून गोलंदाजाने आयती संधी गमावली अन् विराटला जीवदान मिळाले. विराट ऋषभवर संतापला होता. पण, ऋषभने त्याला मिठी मारली आणि माफी मागीतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Assembly Elections: विधासभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार आता दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

ऑनलाइन फोन मागवला, ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी संपवले, मृतदेहाचे तुकडे करून फेकले, कारण काय?

SCROLL FOR NEXT