Ind vs Eng Test  sakal
क्रिकेट

Ind vs Eng Test : भारताचे लक्ष्य : अबकी बार ३-१ च्या पार! ; धरमशालामधील थंड वातावरणात गरमागरम खेळाची अपेक्षा

मालिका भले भारताने जिंकली असेल तरी संघर्ष कमी झालेला नाही. त्यामुळे उद्यापासून धरमशालामध्ये अतिशय थंड वातावणारत सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात गरमागरम म्हणजेच आक्रमक खेळाची अपेक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

धरमशाला : मालिका भले भारताने जिंकली असेल तरी संघर्ष कमी झालेला नाही. त्यामुळे उद्यापासून धरमशालामध्ये अतिशय थंड वातावणारत सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात गरमागरम म्हणजेच आक्रमक खेळाची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील ३-१ या विजयी आघाडीवर समाधान न मानता आक्रमक क्रिकेट सातत्याने खेळणाऱ्या इंग्लंडला अजून एक धक्का देऊन भारतीय संघ ही मालिका ४-१ अशी जिंकण्यास सज्ज झाला आहे. खेळपट्टीचा स्वभाव भारतीय दिसला तरी हवेतील उष्णता वेगवान गोलंदाजांना किती मदत करते, हा उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. धरमशाला कसोटीतला विजय भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यातील प्रवेशाकडे अजून एक पाऊल घेऊन जाणार असल्याने भारतीय संघ आव्हान पेलायला तयार झाला आहे.

अभय पाटणकर यांनी तयार केले मैदान

गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात धरमशालामध्ये प्रचंड पाऊस पडला होता. एक कालखंड असा होता की सतत आठ दिवस पाऊस पडायचा थांबला नाही. मैदानाला अत्याधुनिक व्हॅक्युम प्रणाली लावली होती, ज्याचा वापर योग्यवेळी केला न गेल्याने नुकसान झाले. मैदानावरील गवत सतत पाण्यात राहिल्यामुळे कुजले. परिणामी विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान धरमशाला मैदानावरील बाहेरचे गवत खराब झाल्याने बरीच टीका केली गेली. गेल्या दोन महिन्यात अभय पाटणकर या मराठी अभ्यासू माणसाने प्रचंड मेहनत करून धरमशाला मैदानावरील बाहेरचे गवत सुंदर प्रकारे जोपासले आहे. पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होत असताना धरमशाला मैदानाचे दृश्य सुंदर दिसले तर त्यामागे एका मराठी माणसाचा हात असल्याचे विसरता येणार नाही.

पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व?

धरमशालाची खेळपट्टी तयार करताना गवताची झाक काढून टाकण्यात आली आहे. खेळपट्टीचा रंग पांढरटसर दिसत असल्याने चांगले रोलिंग झाल्याचे समजते आहे. म्हणजेच खेळपट्टी पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात जरा वेगवान गोलंदाजांना मदत करेल, नंतर फलंदाजीला पोषक होत तिसऱ्‍या दिवशीनंतर फिरकीला साथ देण्याचा अंदाज रोहित शर्माने व्यक्त केला आहे.

आकाशात तुरळक ढग असल्यामुळे धरमशालाला लख्ख ऊन कमी पडत आहे. हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेलेली असली तरी सामन्यातला व्यत्यय अत्यल्प असेल असे बोलले जात आहे. खेळपट्टी कशीही दिसली तरी गार हवामानामुळे इंग्लंड संघाने अँडरसन आणि मार्क वूड या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजाचा समावेश केला आहे. नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेईल, असे वाटते. अर्थातच सामना चालू झाल्यानंतरचा पहिला तास वेगवान गोलंदाज फलंदाजांना कठीण प्रश्न विचारतील.

जसप्रीत बुमरा संघात परतण्याचा एकमेव बदल भारतीय संघात होण्याचे संकेत रोहित शर्माने दिले आहेत. तीन सलग कसोटी सामन्यांत धावा करण्यात अपयशी ठरलेल्या रजत पाटीदारला अजून एक संधी मिळायची शक्यता बोलली जात आहे. चार सामने बऱ्‍यापैकी अटीतटीचे झाले आहेत. भारतीय संघाला आम्ही चापटीत सापडवले होते प्रत्येक सामन्यात. हैदराबाद सामन्याचा अपवाद वगळता नंतरच्या तीन सामन्यांत भारतीय संघाने निर्णायक क्षणी खेळाचा दर्जा वाढवला आणि अडचणीतून मार्ग काढल्याचे मत बेन स्टोक्सने व्यक्त करून एका अर्थाने भारतीय संघाला मानवंदना दिली.

भारत विरुद्ध इंग्लंड

  • पाचवी कसोटी आजपासून

  • ठिकाण : धरमशाला

  • वेळ : सकाळी ९.३० पासून

  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्‌स १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT