Rahul dravid  esakal
क्रिकेट

IND vs ENG 5th Test Pitch Report : राहुल-रोहित इंग्रजांना देणार सरप्राईज; धरमशालेची खेळपट्टी आपला गुणधर्मच सोडणार?

IND vs ENG 5th Test Pitch Report Dharamshala : धरमशालेची खेळपट्टी कायम वेगवान गोलंदाजांना साथ देते. तेथील वातावरण देखील वेगवान गोलंदाजांनाच पोषक असते. मात्र टीम इंडियाचा वेगळाच प्लॅन दिसतोय.

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG 5th Test Dharamshala Pitch : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा धरमशाला येथे खेळवण्यात येणार आहे. 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी कशी असेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

इंग्लंड मालिकेत अखेर वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी मिळणार म्हणून खुश असेल मात्र रोहित अन् राहुल द्रविड ही जोडी इंग्रजांना सप्राईज देऊ शकते.

अचानक आलेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी तपकिरी रंगाची दिसत आहे. सोमवारी स्वच्छ हवामानामुळे क्युरेटर्सला खेळपट्टीवर काम सुरू करता आले. भारतीय संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून खेळपट्टीचे स्वरूप क्युरेटर ठरवेल.

जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक असलेल्या धरमशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या सामन्यात इंग्लंडला संथ टर्नर खेळपट्टीचा सामना करावा लागू शकतो.

सामना पुढे सरकेल तसे फिरकीला साथ देणारी खेळपट्टी भारतासाठी भूतकाळात फायदेशीर ठरली आहे. हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर अशाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळून भारताने मालिकेत 3-1 अशी विजय आघाडी घेतली. टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकून अंतिम सामन्यापूर्वीच मालिका जिंकण्यात यश आले. धरमशालाची खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी मानली जाते, परंतु त्याच्या स्वभावाच्या विपरीत, येथे फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येते.

दरम्यान, धरमशालेत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून असे सूचित होते की भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह बिलासपूर जिल्ह्यात खेळ महाकुंभच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करतील. ते हेलिकॉप्टरने येण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेश सचिव नरेंद्र अत्री यांनी कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल आणि ॲथलेटिक्ससह विविध क्रीडा उपक्रम येत्या काही दिवसांत लुहनू मैदानावर होणार असल्याची घोषणा केली.

स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर एचपीसीएचे माजी अध्यक्ष ठाकूर आणि त्यांचे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बंधू अरुण धुमाळ यांची पोस्टर्स आहेत.

(Cricket Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT