IND vs NZ 1st Test esakal
क्रिकेट

IND vs NZ 1st Test : भारत-न्यूझीलंड कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली; जाणून घ्या Revised Session Timings

Swadesh Ghanekar

IND vs NZ 1st Test day 1 Marathi Updates : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेली टीम इंडिया घरच्या मैदानावरील आणखी एका मालिका गाजवण्यासाटी सज्ज झाली आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावरील दबदबा कायम राखताना मागील मालिकेत बांगलादेशवर २-० असा दणदणीत विजय मिळवला आहे. आता त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे, परंतु किवी संघ श्रीलंकेत कसोटी मालिकेत मार खावून भारतात आला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर त्यांचा निभाव लागणे अवघडच आहे. पण, त्यांच्या मदतीला पाऊस धावून आलेला दिसतोय आणि बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे पूर्ण वाया गेला आहे.

WTC Final साठी मालिका महत्त्वाची...

मागील दोन पर्वांत उपविजेतेपदावर समाधान मानावा लागणारा भारतीय संघ यंदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून आयसीसी स्पर्धांचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद रोहितला खुणावतंय. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ च्या पर्वात ११ सामन्यांत ८ विजय, २ पराभव व १ ड्रॉ अशा निकालांसह ७४.२४ टक्केवारी मिळवून तालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) आणि श्रीलंका ( ५५.५६) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असलेले संघ फायनलच्या शर्यतीत आहेत.

दोन्ही संघ

  • भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

  • न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, मार्क चॅम्पमन, विल यंग, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचीन रवींद्र, टॉम ब्लंडल, अजाझ पटेल, बेन सिर्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, विलियम ओ'रौर्क

IND vs NZ 1st Test
  • सामना कधी होणार ? - १६ ते २० ऑक्टोबर, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

  • वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण - Sports18 आणि Colors Cineplex TV channels व Jio Cinema app वर

दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली...

बंगळुरूत दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवसाचा बराचसा सामना पावसामुळे वाया जाणार आहे. आजचा संपूर्ण दिवस वाया गेल्यानंतर BCCI ने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली आहे. उद्या सकाळी ८:४५ वाजता नाणेफेक होईल आणि त्यानंतर सत्रांची विभागणी खालीलप्रमाणे केली गेली आहे...

  • सकाळचे सत्र - ९:१५ ते ११:३० वा.

  • दुपारचे सत्र - १२:१० ते २:२५ वा.

  • सायंकाळचे सत्र - २:४५ ते ४:४५ वा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

PAK vs ENG, 2nd Test: पाकिस्तानविरुद्ध बेन डकेटचं वादळी शतक, पण इंग्लंडला शेवटी धक्के; १५ धावांत गमावल्या ४ विकेट्स

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Shakib Al Hasan अखेरचा सामना मायदेशातच खेळणार! ढाका कसोटीसाठी बांगलादेश संघात समावेश

SCROLL FOR NEXT