IND vs NZ 1st Test esakal
क्रिकेट

IND vs NZ 1st Test : भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी उद्यापासून; जाणून घ्या वेळ, ठिकाण अन् Live Telecast कुठे पाहता येणार

India vs New Zealand 1st Test : घरच्या मैदानावर बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया आणखी एका आव्हानासाठी सज्ज झाली आहे. पण, यावेळी त्यांच्यासमोर न्यूझीलंडसारखा तगडा संघ आहे आणि IND vs NZ यांच्यातल्या ३ सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Swadesh Ghanekar

India vs New Zealand 1st Test : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा दणदणीत विजय मिळवला. या मालिका विजयाने भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC ) गुणतक्त्यात अव्वल स्थानावर मजबूत केले आहे. भारतीय संघ ७४.२४ टक्केवारीसह अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड ३७.५० टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना फायनल गाठण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण, श्रीलंका दौऱ्यावर २-० असा पराभव पत्करून ते भारतात दाखल झाले आहेत.

भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामनना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मुंबई ( १ ते ५ नोव्हेंबर) व पुणे ( २४ ते २८ ऑक्टोबर) येथे उर्वरित दोन कसोटी सामने होतील. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होईल. भारतीय संघाला WTC च्या फायनलमधील आपली जागा पक्की करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका जिंकण्याची संधी आहे. भारताची न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील आकडेवारी दमदार आहे. १९५५ ते २०२१ या कालावधीत घरच्या मैदानावर IND vs NZ यांच्यात झालेल्या ३६ कसोटीत भारताने १७ जिंकल्या आहेत, तर २ गमावल्या आहेत. १७ कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत.

दोन्ही संघ

भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, मार्क चॅम्पमन, विल यंग, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचीन रवींद्र, टॉम ब्लंडल, अजाझ पटेल, बेन सिर्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, विलियम ओ'रौर्क

  • सामना कधी होणार ? - १६ ते २० ऑक्टोबर, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

  • वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण - Sports18 आणि Colors Cineplex TV channels व Jio Cinema app वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT