india vs pakistan  esakal
क्रिकेट

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

सकाळ डिजिटल टीम

Hong Kong Cricket Sixes 2024: हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस या स्पर्धेची घोषणा झाली असून नोव्हेंबरमध्ये स्पर्धेचा २०वा हंगाम होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर पाकिस्तीनने आपला संघ देखील जाहीर केला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येतील.

यापूर्वी या स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांसारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेट हाँगकाँगने त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवर पोस्ट शेअर करत या स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली व सुर्यकुमार यादव फटकेबाजी करताना पहायला मिळत आहेत.

" टीम इंडिया हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस या स्पर्धेच्या तयारीत आहे! गर्दीला उत्तेजित करणाऱ्या स्फोटक पॉवर हिटिंगसाठी आणि षटकारांच्या वादळासाठी सज्ज व्हा! अधिक संघ, अधिक षटकार, अधिक उत्साह आणि जास्तीत जास्त रोमांच! हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धा १ ते ३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान होणार आहे, पहायला विसरू नका!" क्रिकेट हाँगकाँगने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले.

ही स्पर्धा १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान टिन क्वांग रोड रिक्रिएशन मैदानावर खेळवली जाईल. ज्यात १२ संघ सहभागी होणार आहेत. सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्स २०२४ ही स्पर्धा पुन्हा होणार आहे. २००५ मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तर पाकिस्तानने एकूण ४ वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे.

महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत ४ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानने आपला संघ देखील जाहीर केला आहे. फहीम अश्रफपाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार असून, आसिफ अलीही यांना संघात स्थान दिले आहे.

पाकिस्तानचा संघ:

फहीम अश्रफ (कर्णधार), आमेर यामीन, आसिफ अली, दानिश अझीझ, हुसैन तलत, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर) आणि शहाब खान

स्पर्धेचे नियम

१) एका संघात सहा खेळाडू असतात.

२) ५ षटकांचा एक डाव असतो. यष्टीरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकतो.

३) पाच ते सहा चेंडूंचे षटक असते. अंतीम सामन्यात आठ चेंडूंचे षटक असते.

४) वाइड आणि नो-बॉलसाठी दोन धावा मोजल्या जातात.

५) षटके पूर्ण होण्यापूर्वी पाच विकेट पडल्यास, शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फलंदाजासह धावपटू म्हणून काम करतो. सहावी विकेट पडल्यावर डाव पूर्ण होतो.

७) प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

Nashik Unauthorized Hoardings : शहराचे विद्रुपीकरण! वाहतूक बेटांवर फलकबाजी; वाहतुकीला अडथळा

SCROLL FOR NEXT