india vs pakistan esakal
क्रिकेट

India vs Pakistan महामुकाबला; कट्टर स्पर्धक एकाच गटात, तारीख, वेळ ठरली

सकाळ डिजिटल टीम

India vs Pakistan: भारत-पकिस्तान दरम्यान महामुकाबला नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. चीनमधील हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेत भारतीय संघ व पाकिस्तान संघ सहभागी होणार असून पाकिस्तानने या स्पर्धेसाठी संघ देखील जाहीर केला आहे. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये एकाच गटात खेळणार असल्यामुळे १ नोव्हेंबर रोजी भारत-पकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येताना पहायला मिळतील.

या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अ गटात (साउथ आफ्रिका, न्युझीलंड, हाँगकाँग), ब गटात ( ऑस्टेलिया, इंग्लंड, नेपाल), क गटात (भारत, पाकिस्तान, युएई), ड गटात (श्रीलंका, बांगलादेश, ओमन) संघ आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये १ नोव्हेंबर रोजी भारत-पकिस्तानचा महामुकाबला होणार हे निश्चित झाले आहे.

सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्स २०२४ ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान टिन क्वांग रोड रिक्रिएशन मैदानावर स्पर्धेचा २०वा हंगाम होणार आहे. २००५ मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तर पाकिस्तानने एकूण ४ वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत ४ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानने आपला संघ देखील जाहीर केला असून फहीम अश्रफ पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे.

पाकिस्तानचा संघ:

फहीम अश्रफ (कर्णधार), आमेर यामीन, आसिफ अली, दानिश अझीझ, हुसैन तलत, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर) आणि शहाब खान

स्पर्धेचे नियम

१) एका संघात सहा खेळाडू असतात.

२) ५ षटकांचा एक डाव असतो. यष्टीरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकतो.

३) पाच ते सहा चेंडूंचे षटक असते. अंतीम सामन्यात आठ चेंडूंचे षटक असते.

४) वाइड आणि नो-बॉलसाठी दोन धावा मोजल्या जातात.

५) षटके पूर्ण होण्यापूर्वी पाच विकेट पडल्यास, शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फलंदाजासह धावपटू म्हणून काम करतो. सहावी विकेट पडल्यावर डाव पूर्ण होतो.

७) प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra gold prices: दसऱ्याला सोन्याची झळाळी, सोनेखरेदीसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Prathamesh Parab : पाण्यासाठी भांडणं ते चार पायऱ्यांवरचं गल्ली क्रिकेट ; प्रथमेशने उलगडल्या त्याच्या चाळीतील घरातील आठवणी

Latest Maharashtra News Updates : किरकोळ बाजारात झेंडू दोनशे पार! फूल विक्रेत्यांकडून भाविकांची चांगलीच लूट

Maratha Reservaton: मराठा समाज व्होट बँक, म्हणूनच दिले आरक्षण; याचिकाकर्त्याचा न्यायालयात युक्तिवाद

Ravan Dahan Upay: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रावण दहनाची राख घरी आणावी की नाही?

SCROLL FOR NEXT