India vs South Africa Women Test: एकिकडे शनिवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावलेली असतानाच भारतीय महिला संघही चेन्नईमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.
भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध चेन्नईमध्ये एकमेव कसोटी सामना होत आहे. या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे.
या सामन्यात भारताने पहिला डाव ६ बाद ६०३ धावांवर घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात ८४.३ षटकात अवघ्या २६६ धावांवर सर्वबाद केलं. भारताकडून एकट्या स्नेह राणाने ८ विकेट्स घेतल्या.
स्नेह राणाने या डावात २५.३ षटके गोलंदाजी करताना ४ षटके निर्धाव टाकली, तसेच ७७ धावा खर्च करत ८ विकेट् घेतल्या. ती महिलांच्या कसोटीत एका डावात ८ विकेट्स घेणारी भारताची दुसरीच, तर एकूण तिसरी क्रिकेटपटू ठरली.
यापूर्वी नितू डेव्हिडने जमशेदपूरला १९९५ साली इंग्ंलड महिला संघाविरुद्ध कसोटीत दुसऱ्या डावात ५३ धावा खर्च करत ८ विरेट्स घेतल्या होत्या. ऍश्ले गार्डनरने नॉटिंगघम कसोटीत इंग्लंड महिला संघाविरुद्धच २०२३ मध्ये चौथ्या डावात ६६ धावा खर्च करत ८ विकेट्स घेतल्या होत्या.
८/५३ - नितू डेव्हिड (भारत विरुद्ध इंग्लंड, जमशेदपूर, १९९६)
८/६६ - ऍश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगघम, २०२३)
८/७७ - स्नेह राणा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, २०२४)
७/६ - मेरी डुग्गन (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, १९५८)
७/७ - बेट्टी विल्सन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, १९५८)
भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या २६६ धावांच सर्वबाद केल्याने पहिल्या डावात ३३७ धावांची आघाडी घेतली. त्याचमुळे दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात मॅरिझन कापने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तसेच स्युन ल्युसनेही ६५ धावांची खेळी केली. मात्र या दोघींव्यतिरिक्त अन्य कोणालाही खास काही करता आले नाही.
भारताकडून पहिल्या डावात स्नेह राणाव्यतिरिक्त दिप्ती शर्माने २ विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.