India vs Sri Lanka 2nd T20I: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेतील दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकला. यासह ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार ८ षटकात ७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य भारताने सातव्या षटकाच्या आतच ३ विकेट्स गमावत ८१ धावा करत पूर्ण केले.
तत्पुर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १६१ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आता तिसरा आणि अखेरचा सामना मंगळवारी खेळला जाणार आहे.
जयस्वाल बाद झाल्यानंतर सातव्या षटकात हार्दिक पांड्याने सातव्या षटकात दुसर्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ७८ धावांचे लक्ष्य ६.३ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. हार्दिक ९ चेंडूत २२ धावांवर नाबाद राहिला.
श्रीलंकेकडून महिश तिक्षणा, वनिंदू हसरंगा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सलामीवीर यशस्वी जयस्वाल चांगला खेळ करत होता. त्याने सहाव्या षटकात वनिंदू हसरंगाविरुद्ध एक षटकारही मारला होता. परंतु, चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याचा झेल डीप मीडविकेटच्या बाऊंड्री लाईनजवळ दसून शनकाने घेतला. जयस्वालने १५ चेंडूत ३० धावा केल्या.
सॅमसन बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक खेळ केला होता. त्याने चौथ्या षचकात तिक्षणाविरुद्ध सलग तीन चौकार मारले होते. मात्र त्याचा अडथळा पाचव्या षटकात मथिशा पाथिरानाने दूर केला. पाथिरानाने त्याला बाद करण्यापूर्वीही त्याने त्याला षटकार खेचला होता. सूर्यकुमारने १२ चेंडूत २६ धावा केल्या.
दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला महिश तिक्षणाने संजू सॅमसनला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे सॅमसनला शुन्यावरच माघारी परतावं लागलं.
पावसामुळे जवळपास पाऊण तास खेळ थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू होणार आहे. पण आता डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी ८ षटकात ७८ धावा करायच्या आहेत. भारताने ३ चेंडूत ६ धावा केल्या आहेत. म्हणजेच आता ४५ चेंडूत ७२ धावा करायच्या आहेत.
पॉवरप्ले २ षटकांचा होणार आहे. तसेच प्रत्येक गोलंदाजाला २ षटकेच गोलंदाजी करता येणार आहे.
श्रीलंकेने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांची जोडी उतरली होती. मात्र पहिल्या तीन चेंडूनंतर पावसाचा जोर वाढल्याने खेळ थांबवण्यात आला.
अखेरच्या षटकांमध्ये श्रीलंकेने झटपट विकेट्स गमावल्या. १७ व्या षटकात रवी बिश्नोईने सलग दोन चेंडूत दसून शनका आणि वनिंदू हसरंगा या दोघांना त्रिफळाचीत केले. या दोघांनाही भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर १९ व्या षटकात कर्णधार चरीथ असलंका १४ धावांवर अर्शदीप सिंगविरुद्ध खेळताना बाद झाला. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने महिश तिक्षणाला २ धावांवर, तर रमेश मेंडिसला १२ धावांवर बाद केलं.
त्यामुळे श्रीलंकेला २० षटकात ९ बाद १६१ धावाच करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
कुशल परेरा आणि आणि कामिंदू मेंडिस यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती. पण अखेर १६ व्या षटकात हार्दिक पांड्याने कामिंदू मेंडिसला २६ धावांवर बाद केले. रिंकु सिंगने डिप स्क्वेअर लेगला त्याचा झेल घेतला.
त्यानंतर १६ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही कुशल परेराला हार्दिकने बाद केले. त्याचा झेलही रिंकु सिंगनेच घेतला. कुशल परेराने ३४ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
कुशल परेराने श्रीलंकेला भक्कम स्थितीत ठेवलं आहे. त्याने आक्रमक खेळताना ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने १३ व्या षटकापर्यंत श्रीलंकेला १०० धावांचा टप्पाही पार करून दिला.
मेंडिस बाद झाल्यानंतरही पाथम निसंकाने कुशल परेराला साथीला घेत श्रीलंकेचा डाव पुढे नेला होता. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झालेली. मात्र, निसंकाला रवी बिश्नोईने पायचीत केले. दरम्यान, निसंकाने रिव्ह्यू घेतला होता. पण त्यात अंपायर्स कॉल आला. त्यामुळे मैदानातील पंचांनी त्याला आधीच बाद दिलेले असल्याने निसंकाला ३२ धावांवर माघारी परतावे लागले.
श्रीलंकेकडून पाथम निसांका आणि कुशेल मेंडिस यांनी सलामीला खेळताना चांगली सुरुवात केली होती. पण कुशल मेंडिसला अर्शदीप सिंगने बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. रवी बिश्नोईने मिड-ऑनवरून धावत येत मेंडिसचा १० धावांवर झेल घेतला.
भारत: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज
श्रीलंका: पाथम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महिश तिक्षणा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो
दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताने एक मोठा बदल केला आहे.
उपकर्णधार शुभमन गिल या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या मानेमध्ये वेदना होत असल्याचे नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले. त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंकेनेही एक प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला असून दिलशान मदुशंकाच्या जागेवर रमेश मेंडिसला संधी दिली आहे.
पावसामुळे मैदान ओले झाले असल्याने भारत आणि श्रीलंका संघातील दुसऱ्या टी२० सामन्याच्या नाणेफेकीला उशीर झाला आहे. दरम्यान, या सामन्यादरम्यानही पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे काहीकाळासाठी सामनाही थांबू शकतो.
India vs Sri Lanka 2nd T20I: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेला शनिवारी (२७ जुलै) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ४३ धावांनी जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.
आता दुसरा सामना रविवारी (२८ जुलै) पाल्लेकेले येथेच खेळवला जाणाक आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता चालू होईल. दरम्यान, हा सामना जिंकला, तर भारतीय संघ मालिकाही खिशात टाकेल. तसेच श्रीलंकेला मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.