Rohit Sharma in colombo sakal
क्रिकेट

IND vs SL ODI Series: रोहित, विराट, श्रेयस श्रीलंकेत पोहोचले; भारताचा बॉलिंग कोच कोण, हेही ठरले

Rohit Sharma & Co. in Sri Lanka: वन डे मालिका कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून सुरू होत असून तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ४ आणि ७ ऑगस्टला दुसरी व तिसरी वन डे होईल.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka ODI Series: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर असलेले भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर पोहोचले आहेत. कर्णधार रोहित शर्मा हा आगामी ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी अमेरिकेतून श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्याच्यासह वन डे मालिकेसाठी संघात निवड झालेले खेळाडूही येथील आयटीसी रत्तनदीपा हॉटेलमध्ये थांबले आहेत. यामध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर वन डे मालिका होणार आहे आणि रोहितसह सर्व खेळाडूंनी सोमवारी नेट सेशनमध्ये सहभाग घेतला. भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हा या सराव सत्रात खेळाडूंसोबत दिसला. वन डे संघातील अन्य खेळाडू लवकरच श्रीलंकेत दाखत होतील. ३० जुलैला तिसरी आणि शेवटची ट्वेंटी-२० मॅच होणार आहे.

दरम्यान, मोर्ने मॉर्केल ( Morne Morkel ) गंभीरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. त्याचा संघातील सहभाग सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून अपेक्षित आहे. संघात मुख्य प्रशिक्षकासह दोन सहाय्यक प्रशिक्षक (अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट), एक गोलंदाजी प्रशिक्षक (मॉर्केल), क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (टी दिलीप), आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक यांचा समावेश असेल.

वन डे मालिका कोलंबोमध्ये २ ऑगस्टपासून सुरू होत असून तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ४ आणि ७ ऑगस्टला दुसरी व तिसरी वन डे होईल.

भारताचा वन डे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Vs Sharad Pawar : दीड लाखांनी जिंकणारे अजित पवार यंदा 'इतक्या' मतांनी पडणार; निकालापूर्वीच जानकरांचा मोठा दावा

खुर्चीवरून उठवलं, हात पकडला अन्... चक्क सासूबाईंसोबत डान्स करताना दिसला किंग खान; व्हिडिओ वायरल

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरी विधानसभेच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विराटनं आता देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं! माजी सहकाऱ्याचा किंग कोहलीला सल्ला

Chhatrapati Sambhajinagar Crime : हवेत गोळ्या झाडण्याचे रील फेमस झालं अन् इंस्टावर राडा करणाऱ्या संभाजीनगरच्या राखी मुरमुरेला अटक...

SCROLL FOR NEXT