Smriti Mandhana  esakal
क्रिकेट

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

Women’s T20I World Cup 2024 : शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी श्रीलंका संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने फटकेबाजी केली.

Swadesh Ghanekar

Women’s T20I World Cup 2024 INDW vs SLW Marathi Updates: Shafali Verma आणि स्मृती मानधना यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर प्रहार करताना भारतीय संघाला सकारात्मक सुरूवात करून दिली. पण, ९८ धावांवर दोन्ही सलामीवीर सलग चेंडूंवर माघारी परतल्या आणि श्रीलंकेला पुनरागमनाची संधी मिळाली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिची मान मागील सामन्यात चमकली होती, त्यामुळे तिच्या कामगिरीकडे लक्ष होतं. पण, हरमनप्रीतने सर्वांना अचंबित करताना दमदार फटकेबाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने जिंकायच्या आहेत. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफालीने आक्रमक सुरुवात केली, तेच पॉवर प्लेमध्ये स्मृती संयमी खेळ करताना दिसली. शफालीने आजच्या सामन्यात फटकेबाजी करून अनेक विक्रम नावावर केले. पॉवर प्लेनंतर स्मृतीने हात मोकळे केले आणि शफालीसह १० षटकांत फलकावर बिनबाद ७८ धावा चढवल्या. शफाली व स्मृती या दोघींनी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच २० वेळा फिफ्टीहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. एलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्या सर्वाधिक फिफ्टी प्लस भागीदारीच्या विक्रमाशी भारतीय ओपनर्सनी बरोबरी केली.

मागील दोन सामन्यांत स्मृतीला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण, आज तिने काही सुरेख फटके मारताना ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर ती रन आऊट झाली. स्मृतीने ३८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. पुढच्या चेंडूवर भारताची आणखी एक सेट फलंदाज शफाली झेलबाद झाली. शफालीने ४० चेंडूंत ४ चौकारांसह ४३ धावांवर झेलबाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरही रन आऊट होऊन तंबूत परतली असती, परंतु थ्रो स्टम्पवर न लागल्याने भारताला दिलासा मिळाला.

स्मृतीने ट्वेंटी-२०त २७ वेळा फिफ्टी प्लस धावा केल्या. सुझी बॅट्सनंतर ( २९) ट्वेंटी-२०त सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करणाऱ्यांमध्ये स्मृतीचा दुसरा क्रमांक येतो. जेमिमा रॉड्रीग्ज आणि हरमनप्रीत यांच्यावर आता जबाबदारी होती आणि जेमिमाला १३ धावांवर जीवदान मिळाले. ३० धावांची ही भागीदारी जेमिमाच्या ( १६) बाद झाल्याने तुटली. हरमनप्रीतने ८४ मीटर लांब षटकार खेचून या वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा षटकार खेचला. २२ धावांवर हरमनप्रीतचा झेल टाकला गेला. हरमनप्रीतने २७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. भारताने ३ बाद १७२ धावा उभ्या केल्या आणि या वर्ल्ड कपमधील या सर्वोत्तम धावा ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT