Shubman Gill | Team India Sakal
क्रिकेट

Shubman Gill ने 7 वर्षांपूर्वीचा कोहलीचा 'विराट' विक्रम मोडला! सुरेश रैनानंतर दुसरा भारी कर्णधार ठरला

India vs Zimbabwe, 3rd T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे.

Pranali Kodre

Shubman Gill Fifty Score: भारताचा झिम्बाब्वे दौऱ्यातील टी२० मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (१० जुलै) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. याबरोबर एक मोठा विक्रमही केला.

गिलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. होता. यावेळी आधी गिलने यशस्वी जयस्वालसह सलामीला फलंदाजी करताना ६७ धावांची भागीदारी केली, तर तिसऱ्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडबरोबर ७२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, गिलने अर्धशतकी खेळी केली.

कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गिलचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. तो ४९ चेंडूत ६६ धावांची खेळी करून बाद झाला. या खेळीमध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गिल कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वात कमी वयात पहिलं अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने हे अर्धशतक केले, तेव्हा गिलचे वय २४ वर्षे आणि ३०६ दिवस आहे.

त्याने या विक्रमाच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने कर्णधार म्हणून २०१७ साली आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २८ वर्षे ३०५ दिवस वय असताना श्रीलंकेविरुद्ध पहिले अर्धशतक केले होते.

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने २०१० मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच २३ वर्षे १९८ दिवस वय असताना अर्धशतक केलं होतं.

दरम्यान, या सामन्यात गिल व्यतिरिक्त ऋतुराजनेही चांगली फलंदाजी करताना २८ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच जयस्वालने २७ चेंडूत ३६ धावंची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT