Richa Ghosh Catch | India vs Pakistan | Women's T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024, India vs Pakistan: महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी (६ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आहेत. दुबईत हा सामना होत असून पहिल्या डावात तरी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसले आहे. भारताची २१ वर्षीय यष्टीरक्षक ऋचा घोषने तिच्या अफलातून झेलने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरले. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला होता. ५२ धावांवरच पाकिस्तानने ५ विकेट्स गमावल्या होत्या.

त्यामुळे नंतर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना डाव सावरण्याचा प्रयत्न करत होती. आक्रमक खेळण्याचा तिचा प्रयत्न होता. १४ व्या षटकात तिने आशा शोभनाविरुद्ध चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग दोन चौकारही मारले होते.

पण सहाव्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या फातिमाच्या बॅटच्या बाहेरच्या कडाला चेंडूचा स्पर्श झाला आणि तो चेंडू उडाला. यावेळी ऋचाने चपळाईने अवघ्या ०.४४ सेकंदात उडी मारून उचव्या हाताने झेल घेतला. त्यामुळे फातिमाला १३ धावांवरच माघारी परतावे लागले.

या सामन्यात पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १०५ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून निदा दारने सर्वाधिक २८ धावा केल्या. तिच्याशिवाय मुनिबा अली (१७), फातिमा सना (१३) आणि सईदा आरुब शाह (१४*) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बाकी कोणालाही फार काही खास करता आले नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच श्रेयंका पाटीलने २ विकेट्स घेतल्या. तसेच रेणुका ठाकूर सिंग, दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT