India Women Cricket team Sakal
क्रिकेट

IND vs SA Test: भारताच्या पोरींनी दक्षिण आफ्रिकेला लोळवलं! चेन्नई कसोटी 10 विकेट्सने जिंकली

India vs South Africa Women Chennai Test: भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

India Women vs South Africa Women, Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर नुकताच एकमेव कसोटी सामना पार पडला. सोमवारी या सामन्याच्या चौथ्याच दिवशी भारतीय महिला संघाने १० विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात भारतासमोर अवघ्या ३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताकडून सलामीला आलेल्या शुभा सतीश आणि शफली वर्मा यांनी ९.२ षटकातच पूर्ण केला. शुभाने १३ धावांची खेळी केली, तर शफालीने २४ धावांची खेळी केली.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११५.१ षटकात ६ बाद ६०३ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. भारताकडून पहिल्या डावात शफली वर्माने १९७ चेंडूत २०५ धावांची खेळी केली. तिने या खेळीत २३ चौकार आणि ८ षटकार मारले.

स्मृती मानधनाने १६१ चेंडूत १४९ धावांची खेळी केली. तसेच जेमिमाह रोड्रिग्स (55), कर्णधार हरमनप्रीत कौर (69) आणि ऋचा घोष (86) यांनीही अर्धशतके केली.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात डेलमी टकरने २ विकेट्स घेतल्या. तसेच नादिन डी क्लर्क, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको एमलाबा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ८४.३ षटकात २६६ धावांवर संपला. त्यामुळे भारताने ३३७ धावांची आघाडी घेतली. यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑनही दिला.

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात मॅरिझन कापने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तसेच स्युन ल्युसनेही ६५ धावांची खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात स्नेह राणाने ८ विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्माने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५४.४ षटकात ३७३ धावांवर संपला. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि स्युन ल्युस यांनी शतके केली.

वोल्वार्डने ३१४ चेंडूत १२२ धावांची खेळी केली. तसेच ल्युसने २०३ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. याशिवाय नादिन डी क्लार्कने ६१ धावांची खेळी केली. मात्र पहिल्या डावातील पिछाडीमुळे दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर ३७ धावांचे आव्हानच ठेवता आले.

दुसर्‍या डावात भारताकडून स्नेह राणा, दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकर, शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT