India Women Cricket Team X/BCCIWomen
क्रिकेट

India Tour of England 2025: भारतीय पुरुषच नाही, तर महिला संघही पुढच्या वर्षी करणार इंग्लंड दौरा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pranali Kodre

England vs India Women Schedule: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी(२२ ऑगस्ट) महिला आणि पुरुष संघांचे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक घोषित केले आहे. यामध्ये भारतीय महिला संघ करणार असलेल्या इंग्लंड दौऱ्याचाही समावेश आहे.

भारतीय महिला संघ पुढीलवर्षी जूनच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड या महिला संघांमध्ये ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

या दौऱ्याला टी२० मालिकेने सुरुवात होईल. पहिला टी२० सामना २८ जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना नॉटिंगहॅमला होईल. त्यानंतर १ जुलैला दुसरा टी२० सामना ब्रिस्टॉलला, ४ जुलै रोजी तिसरा टी२० सामना लंडनला होईल. चौथा टी२० सामना ९ जुलैला मँचेस्टरला, तर पाचवा टी२० सामना १२ जुलैला बर्मिंगहॅमला होणार आहे.

यानंतर वनडे मालिका १६ जुलैला सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना साऊथॅम्पटनला खेळवला जाईल. त्यानंतर लॉर्ड्सवर दुसरा वनडे १९ जुलैला, तर तिसरा वनडे २२ जुलैला चेस्टर-ल-स्ट्रीटला खेळवला जाणार आहे.

भारतीय महिला संघाचे इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक (वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार)

टी२० मालिका (इंग्लंड विरुद्ध भारत महिला)

  • २८ जून - पहिला टी२० सामना; ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम (संध्या. ७ वा.)

  • १ जुलै - दुसरा टी२० सामना; ब्रिस्टोल (रात्री ११.०० वा.)

  • ४ जुलै - तिसरा टी२० सामना; द किया ओव्हल, लंडन (रात्री ११.०५ वा.)

  • ९ जुलै - चौथा टी२० सामना; ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर (रात्री ११.०० वा.)

  • १२ जुलै - पाचवा टी२० सामना; एजबस्टन, बर्मिंगहॅम (रात्री.११.०५ वा.)

वनडे मालिका (इंग्लंड विरुद्ध भारत महिला)

  • १६ जुलै - पहिला वनडे; साऊथॅम्पटन, (संध्या. ५.३० वा)

  • १९ जुलै - दुसरा वनडे; लॉर्ड्स, लंडन, (दुपारी ३.३० वा)

  • २२ जुलै - तिसरा वनडे; चेस्टर-ल-स्ट्रीट (संध्या. ५.३० वा)

भारतीय पुरुष संघाचाही इंग्लंड दौरा

भारतीय पुरुष संघ देखील पुढीलवर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका २० जून ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान खेळवली जाणार आहे.

भारतीय पुरुष संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक (कसोटी मालिका)

  • २० ते २४ जून - पहिला कसोटी सामना; हेडिंग्ले, लीड्स

  • २ ते ६ जुलै - दुसरा कसोटी सामना; एजबस्टन, बर्मिंगहॅम

  • १० ते १४ जुलै, तिसरा कसोटी सामना; लॉर्ड्स, लंडन

  • २३ ते २७ जुलै - चौथा कसोटी सामना; ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - पाचवा कसोटी सामना; द किया ओव्हल, लंडन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

SCROLL FOR NEXT