India vs Sri Lanka: श्रीलंकेविरूद्ध भारतीय महिला संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आज तिसरा सामना होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताला उपांत्यफेरीमध्ये जाण्यासाठी आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
न्युझीलंडविरूद्धचा पहिला सामना गमवल्यानंतर भारताने पाकिस्तानविरूद्धचा सामाना जिंकला. या विजयाने भारताने २ गुण मिळवत क्रमतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. पाकिस्तानविरूद्धचा सामना भारताने कमी फरकाने जिंकल्यामुळे रन रेट मधील कमी भारत भरू शकला नाही. परंतु ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा नेट रनरेट -०.०५० असा घसरला आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट -१.२१७ असा असला तरी आज श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवून यामध्ये सुधारणेची संधी आहे. पण, तरीही अन्य निकालांवरही बरंच काही अवलंबून आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगला मागच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्या आजच्या सामन्यातील खेळाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ती आता दुखापतीतून सावरली असून आजच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचे नेतृत्व करताना पहायला मिळेल.
दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर आज भारतविरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (९ ऑक्टोबर) खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना पहायला मिळेल.
तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत विजय मिळण्यासाठी बांगलादेशला आजचा सामना जिंकावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.