IND vs BAN. esakal
क्रिकेट

IND vs BAN : टीम इंडिया नाणेफेक जिंकून बांगलादेशला मालिकेतून व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज

सकाळ डिजिटल टीम

IND vs BAN 3rd T20I Match: भारत-बांगलादेश दरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेचा आज शेवटचा सामना आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे होणार आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताला बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक कौल भारताने जिंकला व प्रथम फलंदाजी निवडली आहे.

मागच्या सामन्यात युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीने अष्टपैलू कामगीरी केली. नितीशने ७४ धावांसह दोन विकेट्स मिळवले. तर रिंकू सिंगने २९ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या. भारताने या सामन्यात तब्बल २२१ धावा केल्या तर बांगलादेशची खेळी १३५ धावांवर रोखली आणि सामना ८६ धावांनी जिंकला.

नितिश कुमार या सामन्यात एका डावात ५० अधिक धावा आणि २ किंवा २ पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. तर भारताने यावेळी 'हम सात'वाला विक्रम रचला. या सामन्यात भारताच्या ७ खेळाडूंनी गोलंदाजी केली व सातही विकेट्स घेतले.

तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग-११

भारत - संजू सॅमसन(यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.

बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या! दोन जण ताब्यात

G N Saibaba: दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचे निधन, NIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange Video : राजा माझ्या पाठीशी! उपोषण सुरू असताना जरांगे छत्रपतींच्या पायाला हात का लावायचे?

अदानीचे टेंडर रद्द करणार आणि जागा पोलिसांना..! उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकार आल्यानंतरचा प्लॅन

IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT