INDWvsPAKW T20IW esakal
क्रिकेट

IND vs PAK T20WC : पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला; भारतीय गोलंदाजांनी चांगला फास आवळला

Swadesh Ghanekar

India W vs Pakistan W T20 World Cup Marathi Update:  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अंगलट आला. भारतीय महिला गोलंदाजांनी उत्तम मारा करताना पाकिस्तानच्या धावगतीला लगाम लावली आणि टप्प्याटप्याने विकेट्स घेण्याचे सत्र सुरू ठवेले. अरुंधती रेड्डीने ३ व श्रेयांका पाटीलने २, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा व आशा सोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

पाकिस्तानला पहिल्याच षटकात धक्का बसला. रेणुका सिंग ठाकूरने  शेवटच्या चेंडूवर अप्रतिम ऑफ कटर टाकून सलामीवीर गुल फिरोझाचा ( ०) त्रिफळा उडवला. मुनीबा अली आणि सिद्रा आमीन यांनी रेणुकाच्या दुसऱ्या षटकात दोघींनी १२ धावा चोपल्या. दीप्ती शर्माने तिच्या दुसऱ्या षटकात सिद्रा आमीन ( ८) त्रिफळाचीत केल्याने पाकिस्तानची अवस्था २ बाद २५ अशी झाली. त्यानंतर अरुंधती रेड्डीने तिसरी विकेट घेताना ओमैमा सोहैलला ( ३) बाद केले. मुनीबा दुसऱ्या बाजूने चांगला खेळ करत होती, परंतु धावांचा वेग मंदावल्याने ती दडपणात आली.

श्रेयांका पाटीलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात मुनीबा ( १७) यष्टिचीत झाली. १० षटकांत पाकिस्तानने ४१ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्णपणे पकड घेतली. अलिया रियाझ ( ४) हिली रेड्डीने पायचीत केल्यानंतर कर्णधार फतिमा साना हिचा यष्टिरक्षक रिचा घोषने अविश्वसनीय झेल टिपला. आशा सोभनाने ही विकेट मिळवली. तुबा हसनला ( ० ) श्रेयंकाने माघारी पाठवून पाकिस्तानला ७१ धावांत सातवा धक्का दिला.

संथ खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. पाकिस्तानच्या फलंदाजांना भागीदारीच करू दिल्या नाहीत. पुन्हा एकदा भारताचा षटकांसाठी निर्धारित केलेली वेळ पाळता आली नाही आणि त्यांना शेवटच्या षटकात एक खेळाडू सर्कलच्या आता उभा करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धही हिच चूक महागात पडली होती आणि त्यावेळी ११ धावा कुटल्या होत्या. पण, आज पाकिस्तानला या संधीचं सोनं करता आलं नाही. अरुंधतीने तिसरी विकेट घेतली. पाकिस्तानला ८ बाद १०५ धावांवर समाधान मानावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE Updates: गुलिगत धोकाने करून दाखवलं! सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT