smriti mandhana viral video during indwvapakw match sakal
क्रिकेट

अरे माझ्याकडे काय कॅमेरा दाखवतोस...! Smriti Mandhanaचा मजेशीर Video Viral

Swadesh Ghanekar

IND vs PAK, Asia Cup 2024 : भारतीय महिला संघाने आशिया चषक २०२४ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तान महिला संघाचा डाव १०८ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने १४.१ षटकांत ७ विकेट्स राखून मॅच जिंकली. रेणुका सिंग, पुजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील व दीप्ती शर्मा यांनी गोलंदाजीत कमाल केली. शफाली वर्मा व स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) यांनी दमदार फलंदाजी केली. या सामन्यातील स्मृतीचा एक मजेशीर Video Viral झाला आहे.

प्रथम फलंदीजाला आलेल्या पाकिस्तान महिला संघाचा संपूर्ण डाव १९.२ षटकांत १०८ धावांवर आटोपला. सिद्रा आमीन ( २५) ही त्यांच्याकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तुबा हसन ( २२) व फातिमा सना ( २२) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आणि पाकिस्तानचा संघ शंभरी पार गेला. दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर रेणुका सिंग, पुजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

१०९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली व स्मृती यांनी ९.३ षटकांत ८५ धावांची सलामी दिली. स्मृती ३१ चेंडूंत ९ चौकारांसह ४५ धावा केल्या. शफाली व दयालन हेमलता फलंदाजी करत असताना स्मृती डग आऊटमध्ये बसून मॅच पाहत होती. तेव्हा कॅमेरामन तिच्याकडे फोकस करताना दिसला. हे स्मृतीच्या लक्षात येताच तिने अरे माझ्याकडे काय दाखवतोस, तिकडे दाखवं.. अशी सूचना इशाऱ्याने केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शफारीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४० धावा केल्या. हेमलताने १४ धावा केल्या. भारताने ३ बाद १०९ धावा करून विजय निश्चित करताना अ गटात २ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारतीय संघाचा पुढील सामना उद्या संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT