Ravichandran Ashwin Wife  esakal
क्रिकेट

Ravichandran Ashwin Wife : आश्चर्य, धक्का अन् बरच काही... अश्विनची पत्नी प्रितीने सांगितला लग्नावेळीचा किस्सा

International Women's Day Ravichandran Ashwin Wife : प्रितीनं सांगितलं की एका क्रिकेटरसोबत लग्न करणं म्हणजे नेमकं काय दिव्य असतं.

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin Wife : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे खेळवण्यात येत आहे. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा कसोटी सामना आहे. अश्विनने पहिल्या डावात 4 विकेट्स घेत हा सामना खास केला. 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनचा बीसीसीआयने गौरव केला. यावेळी त्याची पत्नी प्रिती देखील उपस्थित होती.

अश्विनसोबतच्या या प्रवासाबद्दल प्रितीने द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. त्यावेळी अश्विनसोबत लग्न झालं त्यावेळीचा एक किस्सा तिने सांगिला अन् क्रिकेटर सोबत लग्न करणं म्हणजे नक्की काय असतं याचा उलगडा केला.

प्रिती म्हणाली, 'आम्ही लग्नापूर्वी डेटिंग वगेरे काही केलं नाही. तसच अश्विनने मला त्याच्यासोबतच्या मॅरिड लाईफबद्दल देखील कोणतीच कल्पना दिली नव्हती. जेव्हा आमचं लग्न झालं आम्ही वेस्ट इंडीजविरूद्धचा कसोटी सामना खेळण्यासाठी रवाना झालो.'

त्यावेळी आम्हाला माध्यमे इतकी प्रसिद्धी देतील असं वाटलं नव्हतं. मला आठवतय की ज्यावेळी आमच्या लग्नाचे विधी होत होते. त्यावेळी नुसते कॅमेऱ्याचे फ्लॅश पडत होते. आम्ही आमच्या लग्नासाठी कोणता कॅमेरामन हायर केला होता हेच मला कळत नव्हतं. एक क्रिकेटपटूसोबत लग्न करणं आणि आयुष्यभर तो आपल्या अवती-भवती असणं म्हणजे नेमकं काय याची ही झलक होती.'

प्रिती पुढे म्हणली की, 'माझ्या क्रिकेटवरील प्रेमामुळे मी या धक्क्यातून किती लवकर सावरले हे मला माहिती नाही. मला माहिती आहे की माझं अश्विनवर प्रेम आहे. मात्र जर तो जे काम करतोय ते काम जर मला आवडत नसेल तर आज मी जे करतेय ते करू शकले असते का? मला त्याला प्राधान्य देण्यात काही अडचणी नाही. मात्र पहिली काही वर्षे खूप अडखळती गेली. लग्नाबाबतीत नाही मात्र क्रिकेट क्षेत्राने आमच्याकडून अनेक गोष्टी हिरावून घेतल्या.

'आधी आश्चर्य, मग धक्का आणि त्यानंतर ते सगळं नाकारणं झालं. ज्यावेळी आम्हाला अपत्य झालं त्यावेळी मी माझा स्वतःच्या वेळाचा त्याग केला. तुम्हाला एका उच्च स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर त्या यशाची किंमत मोजावी लागते हे समजायला मला वेळ लागला. मग ती किंमत त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ न घालवता येणं असो किंवा त्याची पत्नी आणि मुलांसोबत वेळ न घालवता येणं असो!'

कोरोना काळ एका आशीर्वादासारखा!

प्रितीनं सांगितलं की, 'अश्विन सात वर्षाचा असल्यापासून खेळतोय. मला हे समजायला वेळ लागला की काही वेळा त्यांना इतर कोणत्याच गोष्टाचा गंध नसतो. मात्र कोरोना काळात आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र आलो. एक प्रकारे कोरोना काळ हा आमच्यासाठी आशीर्वादच ठरला. कारण तो आता क्रिकेट खेळणार नव्हता. त्याच काळात आम्ही आठ नऊ वर्षात एखाद्या पती पत्नीसारखं एकत्र राहिलो.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT