Rahul Dravid return in IPL sakal
क्रिकेट

Rahul Dravid return in IPL : राहुल द्रविड आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार; KKR नव्हे 'ही' फ्रँचायझी लवकरच घोषणा करणार

Swadesh Ghanekar

IPL 2025 Rahul Dravid Return : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मेंटॉर किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून विजेतेपद जिंकण्यात मदत केल्यानंतर, द्रविड आता दुसऱ्या संघाचा प्रशिक्षक बनण्यास तयार आहे. द्रविड वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा त्यांचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविड आता कोलकाता नाईट रायडर्सच्या कोचिंग टीममध्ये दिसेल अशी चर्चा रंगली होती. पण, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ''राजस्थान रॉयल्स आणि द्रविड यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल,''असे खात्रीदायक सूत्राने TOI ला सांगितले.

५१ वर्षीय राहुल द्रविड याचे RR फ्रँचायझीसोबत जुने नाते आहे आणि त्याने नेतृत्व करताना २०१३ची चॅम्पियन्स लीग फायनल आणि आयपीएल प्ले ऑफपर्यंत संघाला पोहोचवले होते. त्यानंतर २०१४ व २०१५ मध्ये तो राजस्थान फ्रँचायझीचा मेंटॉर होता. त्याच्या कार्यकाळात संघ तिसऱ्या क्रमांकावर समाधानी राहिला होता. २०१५ नंतर द्रविडने भारताच्या १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष होता. ऑक्टोबर २०२१ पासून त्याने सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर नवीन नोकरीच्या शोधात असल्याचे राहुल द्रविड गमतीने म्हणाला होता. द्रविडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर स्पष्टपणे सांगितले होते की, तो टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यास तयार नाही. द्रविड हा यापूर्वी राजस्थान संघाचा मार्गदर्शक आणि प्रशिक्षक होता. याशिवाय तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षकही राहिला आहे.

राहुल द्रविड RR च्या ताफ्यात आल्यास कुमार संगकाराचे काय, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. २०२१ पासून तो RR चा संचालक म्हणून काम पाहतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT