IPL retention  esakal
क्रिकेट

Rishabh Pant approached RCB : ऋषभ पंतला हवं RCB चं कर्णधारपद? भारतीय यष्टिरक्षकाचं ट्विट अन् चित्र स्पष्ट

Rishabh Pant Leaving Delhi Capitals : आयपीएल २०२५ सुरू होण्यासाठी अजून सात-आठ महिने आहे, पण आतापासून बऱ्याच बदलांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Swadesh Ghanekar

IPL Player Retention 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला आतापासून सुरुवात झाली आहे. BCCI रिटेन्शनबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय पाच खेळाडूंना संघात कायम राखण्यास परवानगी देणार आहेत. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये सर्व संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहे. अशात महेंद्रसिंग धोनीची शेवटची आयपीएल, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, लोकेश राहुल RCB कडे येणार आदी अनेक चर्चा सुरू आहेत. ऋषभ पंत याच्या बाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत की, तो CSK च्या ताफ्यात जातोय, RCBचे कर्णधारपद त्याला हवंय.. या चर्चांवर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने स्वतः ट्विट केलं आहे.

कार अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये मैदानात परतला आणि दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले. मागील पर्वात त्याने १३ सामन्यांत ४४६ धावा केल्या. यामध्ये ८८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. त्याने ११ झेल व ५ स्टम्पिंगही केले. पण, आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनीची रिप्लसमेंट शोधत असताना ऋषभ पंत त्यांच्याकडे जातोय अशी चर्चा रंगली होती. त्यात आता तो RCB कडून खेळेल अशी चर्चा रंगली.

ऋषभ पंत RCB च्या संपर्कात

ऋषभ पंतच्या मॅनेजरने या आठवड्याच्या सुरुवातीला RCB शी चर्चा केली. त्याने कर्णधारपदाची मागणी केली, परंतु RCB च्या संघ व्यवस्थापनाने त्याला नकार दिला. विराट कोहलीला ऋषभ पंत संघात नको आहे, कारण भारतीय संघात व DC मध्ये तो खूप राजकारण खेळतो, असे ट्विट व्हायरल झाले आहे.

ऋषभ पंतचे प्रत्युत्तर...

ऋषभने ट्विट केलं की, ही खोटी बातमी आहे. सोशल मीडियावर तुम्ही अशा खोट्या बातम्या का पसरवता, हेच कळत नाही. हे खूप वाईट आहे. कोणतंही कारण नसताना वातावरण दुषित करू नका. हे असं प्रथमच घडत आहे असं नाही किंवा शेवटचं आहे असंही नाही. तुमचे सोकॉल्ड सूत्र जरा तपासून घ्या. हे अती होत चालले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena AB Form: ठाकरेंच्या शिवसेनेनं दिले 'या' उमेदवारांना AB फॉर्म; वाचा यादी

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Online Fraud: डिजिटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? यंदा सणासुदीच्‍या काळात अशा घोटाळ्यांपासून सुरक्षिततेसाठी ५ महत्त्वपूर्ण उपाय

IPL 2025 Retention : गुजरात टायटन्स परदेशी 'बाबू'ला देणार १८ कोटी अन् Shubman Gill ला दाखवणार 'ठेंगा'; कॅप्टन ऑक्शनमध्ये उतरणार?

Journey Marathi Movie : आयुष्याच्या प्रवासाची गोष्ट उलगडणारा जर्नी सिनेमाचं पोस्टर रिलीज ; 'हे' कलाकार करतायेत काम

SCROLL FOR NEXT