IPL Player Retention  esakal
क्रिकेट

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IPL Player Regulations 2025-27 - BCCI मुख्यालयात जुलैमध्ये १० फ्रँचायझींच्या मालकांशी झालेल्या चर्चेनंतर IPL 2025-2027 साठी काही नियम ठरवण्यात आले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) गव्हर्निंग कौन्सिल (GC) ची आज बंगळुरू येथे बैठक झाली.

Swadesh Ghanekar

IPL Retention 2025-2027 : भारतीय नियामक मंडळाने ( BCCI ) आज इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ते २०२७ साठी काही नियम जाहीर केले आहेत. यामध्ये फ्रँचायझी ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात, यात जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडूंना कायम राहतील. बीसीसीआयने जाहीर केलेल्या घोषणेतील सातवा नियम हा MS Dhoni साठी खूप महत्त्वाचा आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झालेल्या खेळाडूला अनकॅप्ड म्हणून फ्रँचायझी संघात ठेवू शकते. याशिवाय परदेशी खेळाडूंसाठी काही कठोर नियम घेतले गेले आहेत.

बीसीसीआयने जाहीर केलेले ८ महत्त्वाचे नियम...

  • आयपीएल फ्रँचायझी एकूण ६ खेळाडूंना रिटेन म्हणजेच संघात कायम ठेवू शकतात. हे एकतर रिटेन्शनद्वारे किंवा राईट टू मॅच (RTM) पर्यायाचा वापर करून असू शकतात.

  • ६ रिटेन्शन्स / RTM मध्ये जास्तीत जास्त ५ कॅप्ड खेळाडू (भारतीय आणि परदेशी) आणि जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.

  • IPL 2025 साठी फ्रँचायझींसाठी लिलाव पर्सची किंमत १२० कोटी ठेवण्यात आली आहे. एकूण पगाराच्या कॅपमध्ये आता लिलाव पर्स, वाढीव वेतन आणि सामना शुल्क यांचा समावेश असेल. २०२४ मध्ये एकूण वेतन कॅप ( लिलाव पर्स + वाढीव कामगिरी वेतन ) ११० कोटी होते, ते आता १४६ कोटी (२०२५), १५१ कोटी (२०२६) आणि १५७ कोटी (२०२७) असे असतील.

  • आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या (इम्पॅक्ट प्लेअरसह) खेळाडूला ७.५ लाख प्रति सामना फी मिळेल. ही त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल.

  • परदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या लिलावासाठी अपात्र ठरेल.

  • लिलावात नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने पर्व सुरू होण्यापूर्वी माघार घेईल, तर त्याला २ पर्व लीगमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदवण्यास बंदी घालण्यात येईल.

  • भारतीय खेळाडू मागील पाच कॅलेंडर वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसेल तर तो कॅप्ड भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल. हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल.

  • २०२५-२०२७ सायकलसाठी इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT