IPL retention esakal
क्रिकेट

IPL 2025 मध्ये ३ खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर सांगू शकतात दावा, दोन नावं तुम्हाला माहित आहेत...

Hardik Pandya Mumbai Indians Captain : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सर्व संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव होणार आहे.

Swadesh Ghanekar

IPL 2025 retention Auction : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वात रोहित शर्माकडून नेतृत्व काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. पण, Mumbai Indians हा निर्णय चाहत्यांना पटला नाही आणि त्यांनी हार्दिकला प्रचंड ट्रोल केले. परिणामी हार्दिकच्या वैयक्तिक आणि संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला तालिकेत खालच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आता आयपीएल २०२५ मध्ये फ्रँचायझी या चुका टाळतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे आणि कर्णधार बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत...

हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला पहिल्याच पर्वात जेतेपद पटकावून दिले होते आणि पुढच्या पर्वात उपविजेतेपदापर्यंत पोहोचवले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या जुन्या खेळाडूला पुन्हा संघात आणले व थेट कॅप्टन केले. पण, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असलेला दबाव त्याला झेपला नाही आणि कामगिरी घसरली. आता त्याच्याकडून हे कॅप्टनशीप काढून घेण्याच्या चर्चा आहेत. अशात तीन खेळाडू त्याला रिप्लेस करण्याच्या शर्यतीत आहेत.

सूर्यकुमार यादव - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिककडे जाईल अशी शक्यता होती. पण, सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२०चे नेतृत्व दिले आणि आता त्याच्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्याची चर्चा आहे. सूर्याने टीम इंडियाचे नेतृत्व करताना १० पैकी ८ सामने जिंकले आहेत.

Suryakumar Yadav

जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स अनुभवी जसप्रीत बुमराहचा कर्णधार म्हणून विचार करू शकतातत.. त्याने अप्रत्यक्षपणे या पदासाठी इच्छा व्यक्तही केली होती. जर हार्दिक पांड्याला रिटेन नाही केलं तर जसप्रीत कर्णधार म्हणून सक्षम पर्याय MI समोर आहे. सूर्यालाही त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास काहीच अडचण नसेल. जसप्रीतने ३ ट्वेंटी-२० व १ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. ट्वेंटी-२०त त्याने २ विजय मिळवले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

Jasprit Bumrah Statement On Retirement

लोकेश राहुल - लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला, तर त्याची कर्णधारपदी निवड केली जाऊ शकते. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय व आयपीएलचा पुरेसा अनुभव आहे. शिवाय इशान किशनला रिटेन केलं जाण्याची शक्यता कमीच आहे आणि अशात एक सलामीवीर व यष्टिरक्षक म्हणून लोकेश राहुल उत्तम पर्याय आहे.

KL Rahul LSG

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT