MS Dhoni CSK esakal
क्रिकेट

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

Swadesh Ghanekar

IPL 2025 Retention CSK MS Dhoni : BCCI ने शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगसाठी नवीन रिटेन्शन नियम जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडू कायम राखता येणार आहे. या सहा खेळाडूंमध्ये किती भारतीय, किती परदेशी आणि किती RTM हा निर्णय पूर्णपणे फ्रँचायझीवर सोपवला गेला आहे. याच नियमामध्ये MS Dhoni च्या फेव्हरमध्ये जाणार निर्णय आहे. ज्यानुसार चेन्नई सुपर किंग्सकडून माजी कर्णधाराला कायम राखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत..

काय आहे तो नियम?

४१ वर्षीय धोनीला रिटेन करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला मोठी रक्कम मोजावी लागणार होती. त्यासाठीच त्यांनी BCCI कडे २००८ चा जुना नियम आणण्याची विनंती केल्याचे वृत्त होते. पण, CSK अशी कोणतीच विनंती केली नसल्याचे जाहीर केले. तरीही बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन नियमांत ती विनंती मान्य झाल्याचे दिसले. यानुसार, भारतीय खेळाडू मागील पाच कॅलेंडर वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसेल तर अनकॅप्ड खेळाडू म्हणून त्याची नोंद होईल. हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल.

त्यामुळेच आता महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कमी किमतीत कायम राखण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयने अनकॅप्ड खेळाडूसाठी ४ कोटी ही रक्कम ठरवली आहे. धोनीला CSK ने मागील लिलावात १२ कोटींत कायम राखले होते.

काशी विश्वनाथन यांचं मोठं विधान...

४३ वर्षीय महेंद्रसिंग धोनीला संघात अनकॅप्ड म्हणून ठेवायचे का, याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. पण, त्याआधी चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन ( Kasi Viswanathan ) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

या क्षणाला आम्हालाही खात्रीशीर उत्तर देता येणार नाही. अनकॅप्ड खेळाडूच्या नियमाचा वापर कदाचीत आम्ही धोनीसाठी करणार नाही. यावर यावेळी भाष्य करणे, घाईचे ठरेल. कारण, अद्याप आम्ही याबाबत चर्चाही सुरू केलेली नाही. धोनी आता अमेरिकेत नाही आणि आम्ही अजून चर्चा केलेली नाही. या आठवड्यात चर्चा होऊ शकते. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. त्याने खेळावं अशी आम्हाला आशा आहे, परंतु तो सर्वस्व त्याचा निर्णय असेल.
चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक

Mumbai News: ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक मंदावली

हॉटेलमध्ये सेक्स केल्यानंतर अति रक्तस्त्राव होऊन तरूणीचा मृत्यू; बॉयफ्रेंड 2 तास ऑनलाईन उपाय शोधत होता

Ruturaj Gaikwad: BCCI चा ऋतुराजसाठी मोठा प्लॅन; ...म्हणून T20I मालिकेत टीम इंडियात दिले नाही स्थान; कारण ऐकून खूश व्हाल

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांविरोधातील वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल नाशिक न्यायालयाने बजावला समन्स

SCROLL FOR NEXT