Ruturaj Gaikwad vs Ajinkya Rahane Sakal
क्रिकेट

ऋतुराज गायकवाड Vs Ajinkya Rahane! श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी हेही भिडणार; वाचा जबरदस्त सामना केव्हा कुठे रंगणार

Pranali Kodre

Irani Cup 2024, Mumbai vs Rest of India: भारतातील नवा देशांतर्गत हंगाम सुरू झाला आहे. नुकतीच दुलीप ट्रॉफी स्पर्धा संपली असून आता इराणी कप स्पर्धेचा सामना होईल. इराणी कप २०२४ स्पर्धेत रणजी ट्रॉफी २०२३-२४ स्पर्धेचे विजेते मुंबई संघ आणि शेष भारत संघ आमने-सामने असणार आहेत.

इराणी कप स्पर्धेचा सामना १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांचा मुंबई संघ जाहीर केला आहे, तर बीसीसीआयच्या निवड समितीने शेष भारतीय संघ जाहीर केला आहे.

मुंबईचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे, तर शेष भारत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी २७ वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रहाणे विरुद्ध ऋतुराज असा सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सध्या भारत आणि बांगलादेश संघात कसोटी मालिकाही सुरू आहे. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात असलेल्या काही खेळाडूंनाही इराणी कपसाठी दोन्ही संघात संधी देण्यात आली आहे.

पण आता भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना संधी न मिळाल्यास त्यांना इराणी कप स्पर्धेसाठी मुक्त करण्यात येणार आहे. या खेळाडूंमध्ये सर्फराज खान, ध्रुव जुरेल, यश दयाल यांचा समावेश आहे. तसेच शिवम दुबेही भारतीय संघाबरोबर व्यस्त असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या वृत्तानुसार समजत आहे.

सर्फराज आणि शिवम यांना जर भारतीय संघाने मुक्त केले, तर ते मुंबईकडून इराणी कप स्पर्धेत खेळताना दिसू शकतात.

त्याचबरोबर यष्टीरक्षक ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल यांना शेष भारत संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई संघात रहाणे कर्णधार असून सिद्धेश लाडचेही पुनरागमन झाले आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा खेळण्यास सज्ज असलेल्या शार्दुल ठाकूरचीही निवड मुंबई संघात करण्यात आली आहे. सलामीला आयुष म्हात्रेला निवडण्यात आले आहे. पृथ्वी शॉ देखील मुंबई संघात आहे.

शेष भारत संघाबाबत सांगायचे झाले तर ऋतुराज कर्णधार असून अभिमन्यू ईश्वरन यांच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, मुकेश कुमार, खलील अहमद अशा अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे.

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस

शेष भारत संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

SCROLL FOR NEXT