IRE vs SA esakal
क्रिकेट

IRE vs SA JP Duminy: खेळाडू दमला, प्रशिक्षक फिल्डिंगला आला; डाईव्ह मारून चेंडू असा अडवला की... Video Viral

Swadesh Ghanekar

IRE vs SA Coach JP Duminy Fielding: दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातला तिसरा वन डे सामना चर्चेत आला तो फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्यूमिनी याच्यामुळे... अबुधाबीच्या गरमीत आफ्रिकेच्या खेळाडूला थकवा जाणवू लागला आणि त्यामुळे ड्यूमिनी क्षेत्ररक्षणासाठी आला आणि त्याने अप्रतिम डाईव्ह मारून क्षेत्ररक्षण केले. आयर्लंडने ६९ धावांनी हा सामना जिंकला.

अबुधाबीच्या शेख जयद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या काही खेळाडूंना प्रकृतीची समस्या जाणवली. दोन विकेट्स घेणारा ऑटनेल बार्टमन याला गरमीचा एवढा त्रास झाला की तो शेवटची दोन षटकं शिल्लक असताना मैदानाबाहेर गेला. त्याच्यासह आणखी काही खेळाडूंना हा त्रास जाणवला आणि त्यामुळे फलंदाजी प्रशिक्षक जे पी ड्यूमिनी याला क्षेत्ररक्षणासाठी यावं लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या पाच वर्षानंतर ड्यूमिनी पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाच्या जर्सीत दिसला आणि त्याने डाईव्ह मारून अप्रतिम बचावही केला.  

जेपी ड्युमिनीने सप्टेंबर २०१७ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर त्याने वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. या मालिकेत दक्षिण आफ्रिकने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे १३९  धावा आणि १७४ धावांनी मोठा विजय नोंदवला होता. पण, तिसऱ्या सामन्यात आयर्लंडच्या ९ बाद २८४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४६.१ षटकांत २१५ धावांवर तंबूत परतला.

कर्णधार पॉल स्टर्लिंग ( ८८), हॅरी टेक्टर ( ६०) यांच्या अर्धशतकी खेळीला अँडी बालबर्नी ( ४५), कर्टीस कॅम्फर ( ३४) आणि लॉर्कन टकर ( २६) यांची साथ मिळाली. आयर्लंडने ९ बाद २८४ धावा उभ्या केल्या. आफ्रिकेकडून लिजाड विलियम्सने ४, ऑटनेल व अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेची गाडी घसरली. जेसन स्मिथने ९३ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ९१ धावा करून एकट्याने खिंड लढवली. कायले वेरेयने ( ३८), त्रिस्तान स्तब्स ( २०) व फेहलुकवायो ( २३) यांनी थोडाफार हातभार लावला. आयर्लंडच्या ग्रॅहम ह्यूम  व क्रेग यंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT