Ishan Kishan Marathi News sakal
क्रिकेट

Ishan Kishan : तीन महिन्यांच्या ड्रामानंतर इशान किशन मैदानात परतला पण...

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने अखेर मंगळवारी डीवाय पाटील टी-20 चषकात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

Kiran Mahanavar

Ishan Kishan : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने अखेर मंगळवारी डीवाय पाटील टी-20 चषकात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. इशानने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मध्यंतरी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.

तेव्हापासून, अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले होते की, राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे क्रिकेट खेळावे लागेल.

इशान रणजी ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. त्याऐवजी त्याने आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सराव करण्याचे ठरवले. त्याने हार्दिकसोबतच्या जिम सेशनचा व्हिडिओही शेअर केला होता.

पण तीन महिन्यांच्या ड्रामानंतर मंगळवारी इशान नवी मुंबईतील डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) संघासाठी रूट मोबाइल लिमिटेडविरुद्ध खेळताना दिसला. पण तो त्या सामन्यात एकदम फ्लॉप दिसला. मिडऑफमध्ये मॅक्सवेल स्वामीनाथनला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्नात 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. आरबीआयच्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या षटकात इशानची विकेट पडली.

इशानपूर्वी हार्दिकही या स्पर्धेतून मैदानात परतला. हार्दिकने आपल्या कामगिरीने रिलायन्स 1 संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीमुळे संघाने बीपीसीएलला 18.3 षटकात 126 धावांवर रोखले. हार्दिकने तीन षटकांत 22 धावा देत दोन बळी घेतले.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला. त्याने त्याच्या फिटनेसवर बरेच काम केले आणि तो आयपीएलपूर्वी पूर्णपणे तयार झाला. यावेळी तो रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. हार्दिक गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळला. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ 2022 मध्ये चॅम्पियन बनला आणि 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अंतिम फेरीत हरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT