James Anderson becomes first pacer to get 700 Test wickets 
क्रिकेट

James Anderson : @700... अँडरसन तुसी ग्रेट हो! भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात केला मोठा विक्रम अन् रचला इतिहास

भारताविरुद्ध कसोटी सामन्यात जेम्स अँडरसनने केला कहर!

Kiran Mahanavar

James Anderson 700 Test wickets : इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवला आऊट करून त्याने असा विक्रम केला जो याआधी कोणत्याही वेगवान गोलंदाजाला करता आला नव्हता. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने वयाच्या 41 व्या वर्षी एक नवा विक्रम केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातील पहिल्या डावात खेळाच्या तिसऱ्या दिवशी त्याने इतिहास रचला. 700 कसोटी बळी घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला.

भारताविरुद्धच्या धरमशाला कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 16 षटकात 60 धावा देत 2 बळी घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला बाद करणाऱ्या अँडरसनने तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवला विकेटच्या मागे झेलबाद केले. ही विकेट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय विकेट ठरली. कुलदीप यादव 68 चेंडूत 30 धावा करू शकला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध 700वी विकेट घेत इतिहास रचला. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे पण लवकरच तो दुसरा क्रमांक गाठू शकतो.

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर कसोटीत सर्वाधिक विकेट्सची नोंद आहे. तो 800 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न 708 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 619 विकेट घेतल्या असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT