James Anderson Retirement esakal
क्रिकेट

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

अनिरुद्ध संकपाळ

James Anderson Retirement : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने अखेर आपलं शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जेम्स अँडरसनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत आपल्या निवृत्तीचा प्लॅन सांगितला.

जेम्स अँडरसन आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, हंगामाची लॉर्ड्सवरील पहिली कसोटी ही माझा शेवटची कसोटी असेल. देशाचे 20 वर्षे प्रतिनिधित्व करणे हे अद्भुत होतं. मी लहान असल्यापासूनच क्रिकेट खेळणे मला आवडायचे.

मी आता इंग्लंडकडून मैदानात उतरणार नाही. मी हे सर्व मिस करेन. मात्र मला माहिती आहे की बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे. दुसऱ्यांना देखील मी जो स्वप्नवत प्रवास केला त्याची अनुभूती घेण्याची संधी देणे गरजेचे आहे. याच्यासारखी जबरदस्त फिलिंग नाही.'

जेम्स अँडरसनने आपल्या कुटुंबीयांचे आभार मानले. तो म्हणाला की, 'मी हे सर्व डॅनेएला, लॉरा, रूबी आणि माझ्या पालकांशिवाय हे करू शकलो नसतो. त्यांचे आभार. याचबरोबर माझ्यासोबत खेळलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे देखील आभार. त्यांच्यामुळेच मी हे जगतील सर्वात चांगले काम करू शकलो.

आयुष्यातील नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मी उत्सुक आहे. आता माझ्या दिवसाचा जास्त काळ गोल्फ खेळण्यात जाईल.'

इंग्लंडचा स्विंग मास्टर जेम्स अँडरसनने आतापर्यंत 187 सामने खेळले आहेत. अँडरसनने 2003 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 348 डावात 700 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 194 सामन्यात 269 विकेट्स तर 19 टी-20 सामन्यात 18 विकेट्स आहेत.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT