Maharashtra vs Jammu & Kashmir: महाराष्ट्रविरूद्ध जम्मू-काश्मीर सामन्याचा दुसरा दिवस समाप्त झाला असून जम्मू-काश्मीर संघाने पहिल्याच डावात तब्बल ५१९ धावा उभारल्या आहेत. जम्मूच्या शुभम खजुरीयाने सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. तर शिवांश शर्मा शतकी खेळी करून डावात नाबाद राहीला. ७ विकेट्स गमावले असताना जम्मू-काश्मीर संघाने डाव जाहीर केला. परंतु प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्राच्या खात्यात भोपळा असतानाच धक्का मिळाला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या महाराष्ट्राने पहिल्याच षटकाच विकेट घेत डावाची चांगली सुरूवात केली. पण, सलामीवीर शुभम खजुरीयाने सामन्याची एक बाजू लावून धरली ती अगदी संघ ४०० पार होईपर्यंत. शुभमला शिवांश शर्माची साथ मिळाली. दोघांनी संघासाठी तब्बल २१३ धावांची भागीदारी केली.
शुभमने २९ चौकार व ८ षटकारांसह २५५ धावांची खेळी केली. वेगाने धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामुळे शुभम माघारी परतला आणि संघाचा मोर्चा शिवांश शर्माने सांभाळला. शिवांशची १०६ धावांची खेळी संघाला ५०० पार घेऊन गेली. शिवांशने या खेळी दरम्यान १० चौकार व २ षटकार ठोकले. ७ बाद ५१९ अशी धावसंख्या असताना जम्मू-काश्मीर संघाने संघाने डाव जाहीर केला.
प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्र संघाने खातं खोलण्याआधीच एक विकेट गमवला. मुर्तझा ट्रंकवाला बोल्ड होऊन परतला. तर, सिद्धेश विर(१३) व सचिन दास(१०) धावांवर नाबाद आहेत. महाराष्ट्रने दुसऱ्या दिवसाअखेरीस १ विकेट २८ धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.