India vs Sri Lanka 1st ODI Sakal
क्रिकेट

IND vs SL ODI: श्रीलंकेला अतिघाई नडली, फलंदाज नॉटआऊट असूनही परतला पॅव्हेलियनमध्ये अन् मग...; नक्की घडलं काय?

Pranali Kodre

India vs Sri Lanka 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका संघात वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी झाला. कोलंबोला झालेल्या या सामन्यात दोन्ही संघात बरोबरी झाली. दरम्यान, या सामन्यात एक घटना अशी घडली ज्यामुळे श्रीलंकेचा प्रशिक्षक सनथ जयसूर्याही भडकलेला दिसला.

झाले असे की या सामन्यात यजमान श्रीलंका संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र सुरुवातीलाच झटपट विकेट्स श्रीलंकेने गमावल्या होत्या. मात्र सहाव्या क्रमांकावर आलेला जनिथ लियांगे दुनिथ वेल्लालागेसह श्रीलंकेचा डाव पुढे नेत होता.

याचवेळी ३५ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर लियांगेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू खेळपट्टीवरील धूळ उडवून मागे गेला आणि यष्टीरक्षक केएल राहुलच्या पॅडला लागून स्लीपमधील उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.

यावेळी झेलबाद झाल्याचे समजून लियांगे पॅव्हेलियनमध्ये परण्यास निघाला त्याने रिव्ह्युची मागणी केली नाही. त्यामुळे पंचांनीही त्याला बाद दिले.

मात्र नंतर जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला, त्यात चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नसल्याचे स्पष्ट झाले, म्हणजे तो बादच नव्हता. मात्र तो आधीच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने त्याला बाद समजण्यात आले. पण तो रिप्ले पाहून जयसूर्याही चिडला होता. लियांगेने २० धावा केल्या.

श्रीलंकेकडून पाथम निसंकाने ५६ धावांची आणि वेल्लालागेने नाबाद ६७ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ८ बाद २३० धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतल २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही ४७.५ षटकात सर्वबाद २३० धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५८ धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कर्णधार चरिथ असलंका आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT