Jasprit Bumrah Set To Return In Dharamsala Test Match Latest Marathi News sakal
क्रिकेट

Ind vs Eng : शेवटच्या कसोटीत संघात मोठे बदल; बुमराहचे पुनरागमन, तर कर्णधार 'या' दोन खेळाडूंना दाखवणार घरचा रस्ता?

India Vs England 5th Test Playing 11 : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सात मार्चपासून धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो.

Kiran Mahanavar

India Vs England 5th Test Playing 11 : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सात मार्चपासून धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, मंगळवारी भारतीय सर्व खेळाडू रांचीहून रवाना झाले आहेत. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 2 मार्चपर्यंत चंदिगडमध्ये एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुमराहही चंदीगडमध्येच संघात सामील होणार आहे. यानंतर, संपूर्ण टीम चार्टर्ड फ्लाइटने 3 मार्च रोजी धरमशाला जाणार आहेत.

रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. वर्कलोडमुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. रांची कसोटीत बुमराहच्या जागी आकाशदीपने पदार्पण केले. आकाशदीपची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 3 बळी घेतले. या मालिकेत बुमराहची आतापर्यंतची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 3 सामन्यात 13.65 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत.

कर्णधार रोहित संघात करणार दोन बदल?

धरमशाला येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माही प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करू शकतो. क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की, रांची कसोटीत खेळलेल्या 11 खेळाडूंपैकी रोहित एका फलंदाज आणि एका गोलंदाजाला विश्रांती देऊ शकतो. जर विश्रांती देण्याचा विचार केला तर यशस्वी जैस्वालला विश्रांती दिली जाऊ शकते, कारण यशस्वीने या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर एखाद्याला डावलण्याचा विचार झाला तर रजत पाटीदार बाहेर जाऊ शकतो.

केएल राहुल पाचव्या कसोटीतही बाहेर?

धरमशाला कसोटीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या खेळावरही सस्पेंस आहे. हैदराबाद कसोटीपासून संघाबाहेर असलेला राहुल दुखापतीवर उपचारासाठी इंग्लंडला गेला आहे.

अशा परिस्थितीत मालिकेतील शेवटच्या कसोटीत खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे. हैदराबाद कसोटीदरम्यान राहुलला दुखापत झाली होती, त्यानंतर तो विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची कसोटीत खेळला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi यांची १४ नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा, वाहतुकीत मोठा बदल, महत्त्वाचे मार्ग बंद ठेवणार

IPL 2025: दिल्ली संघात २०११ वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री! १८ व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

Sharad Pawar : चुकीची कामे किती करावी, फसवेगिरी किती करावी; फसवेगिरी करणाऱ्यांना धडा शिकवा

Women’s Asian Champions Trophy: दीपिकाच्या गोलमुळे भारताचा विजय; दक्षिण कोरियावर ३-२ने मात

Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....

SCROLL FOR NEXT