WPL 2024 MIW vs DCW  esakal
क्रिकेट

WPL 2024 MIW vs DCW : 4,4,4,4,4,6,6... जेमिमाहचा तडाखा अन् मुंबईची डोकेदुखी वाढली

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Jemimah Rodrigues MIW vs DCW : वुमन प्रीमियर लीग 2024 च्या हंगामात उद्घाटनाचा सामना हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीला पाचारण केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 171 धावा केल्या.

दिल्लीकडून एलिस कॅप्सीने 53 चेंडूत 75 धावांची दमदार खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 24 चेंडूत 42 धावांची खेळी करत संघाला 150 धावांच्या पार पोहचवले. जेमिमाहने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्लीची धाकड सलामीवीर शफाली वर्माला अवघ्या 1 धावेत बाद करत मोठा धक्का दिला होता. शबनीम इस्माईने शफालीची शिकार केली होती. मात्र त्यानंतर कर्णधार मेग लेनिंग आणि एलिस कॅप्सीने दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. यामुळे दिल्लीने 10 षटकात सहाच्या धावगतीने धावा केल्या.

मात्र नॅट सिव्हरने लेनिंगला 31 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर एलिस कॅप्सी आणि जेमिमाह रॉड्रिग्जने डाव पुढे नेत दिल्लीला 155 धावांपर्यंत पोहचवले. जेमिमाहने 175 च्या स्ट्राईक रेटने 24 चेंडूत 47 धावा ठोकल्या. तर कॅप्सीने 75 धावांची खेळी केली. त्यानंतर मारीझाने काप्पने 9 चेंडूत 16 धावा चोपत संघाला 170 धावांच्या पार नेले.

मुंबईसमोर 172 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर त्यांनी 9 षटकात 2 बाद 72 धावा केल्या होत्या. यस्तिका भाटिया अर्धशतकाजवळ पोहचली आहे. तर नॅट सिव्हरने 19 धावांचे योगदान दिलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT