Joe Root Becomes No.1 Test Batter : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी सर्वात मोठा बदल फलंदाजीच्या क्रमवारीत दिसून येत आहे. इंग्लंडच्या जो रूटने गेल्या अपडेटमध्ये न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला अव्वल स्थानावरून मागे टाकत क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग आता 872 पर्यंत वाढले आहे. त्याने एका स्थानावर झेप घेतली आहे. आता न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे रेटिंग 859 आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा बाबर आझम पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग 768 आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलही एका स्थानाच्या वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याचे रेटिंगही 768 आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आता आयसीसी कसोटी क्रमवारीत एका स्थानाने वरच्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 757 आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 751 च्या रेटिंगसह 6 व्या क्रमांकावर आला आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे मोठे नुकसान
दरम्यान, इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे मोठे नुकसान झाले आहे. तो आता थेट सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग 749 आहे. हॅरी ब्रूकच्या घसरणीचा फायदा रोहित शर्मा, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथ आणि डॅरिल मिशेल यांना झाला आहे. भारताचा यशस्वी जैस्वाल 740 रेटिंगसह आठव्या, श्रीलंकेचा दामुथ करुणारत्ने 739 रेटिंगसह नवव्या आणि भारताचा विराट कोहली 737 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या मानांकनात कोणताही बदल झालेला नाही.
टॉप 10 फलंदाज
872 - जो रूट - इंग्लंड
859 - केन विल्यमसन - न्यूझीलंड
768 - बाबर आझम - पाकिस्तान
768 - डॅरिल मिशेल - न्यूझीलंड
757 - स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलिया
751 - रोहित शर्मा - भारत
749 - हॅरी ब्रूक - इंग्लंड
740 - यशस्वी जैस्वाल - भारत
739 - दिमुथ करुणारत्ने - श्रीलंका
737 - विराट कोहली - भारत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.