Kamindu Mendis 5th Test hundred Sakal
क्रिकेट

Kamindu Mendis ची लै भारी कामगिरी! रोहित, विराट यांनाही 'हे' नाही जमलं, पठ्ठ्याची थेट ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Pranali Kodre

Sri Lanka vs New Zealand, 2nd Test: श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात गुरुवारपासून (२६ सप्टेंबर) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्या डावात श्रीलंकेच्या कामिंडू मेंडिसने अफलातून फलंदाजी करताना शतकी खेळी केली आहे. त्याने १४७ चेंडूत त्याचे हे कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने अनेक विक्रम केले आहेत.

मेंडिसचा हा केवळ आठवा सामना आहे. त्याने आठ सामन्यातील १३ व्या डावातच पाचवे कसोटी शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे तो कारकिर्दीतील पहिल्या ८ कसोटीत ५ शतके करणारा २१ व्या शतकातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी हॅरी ब्रुकने त्याच्या पहिल्या ८ कसोटीत ४ शतके केली होती.

तसेच मेंडिसने हे पाचही शतके २०२४ मध्ये केले आहेत. त्यामुळे तो एकाच वर्षात कसोटीत ५ शतके करणारा श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, तिलकरत्ने दिलशान आणि माहेला जयवर्धने यांच्यानंतरचा चौथाच खेळाडू आहे. अरविंद डी सिल्वाने १९९७ मध्ये ७ शतके केली होती, तर दिलशानने २००९ मध्ये ६ शतके केली होती. जयवर्धनेने २००७ मध्ये ५ शतके केली होती.

ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी

मेंडिसने पहिल्या १३ डावात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. ब्रॅडमन यांनीही १३ डावात पाच शतके केली होती. त्यामुळे मेंडिस आणि ब्रॅडमन आता या विक्रमाच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे निल हार्वे असून त्यांनी पहिल्या १३ डावात ६ शतके केली होती. याशिवाय मेंडिस १३ डावात ५ शतके करणारा पहिलाच आशियाई खेळाडू आहे.

दरम्यान, त्याने जर या डावात १७८ धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली, तर तो कसोटीत १००० धावाही पूर्ण करेल. त्यामुळे तो सर्वात जलद कसोटीत १००० धावा पूर्ण करणारा आशियाई फलंदाज ठरेल.

श्रीलंकेच्या ४०० हून अधिक धावा

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मेंडिसपूर्वी दिनेश चंडीमलनेही ११६ धावांची खेळी केली, तर अँजेलो मॅथ्युजने ८८ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात १३७ षटकांपूर्वीच ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिंकला होता. त्यामुळे आता त्यांना दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी असणार आहे. तसेच न्यूझीलंडला मालिका पराभव टाळण्यासाठी दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : विधानसभा तोंडावर असताना निवडणूक आयोगाची राज्य शासनावर नाराजी; मुख्य सचिवांना लिहिलं पत्र

Mumbai University Senate Election Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी, खुल्या वर्गातील उमेदवारांची मतमोजणी सुरू

Param Rudra Supercomputers : PM मोदींनी लॉन्च केलेले सुपर कॉम्प्युटर्स का आहेत खास? जाणून घ्या सर्वकाही

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Kamindu Mendis ने मोडला कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम! 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई, तर ब्रॅडमन यांच्याशीही बरोबरी

SCROLL FOR NEXT