Anshuman Gaekwad | Kapil Dev Sakal
क्रिकेट

दुःख होतंय! कॅन्सरशी लढणाऱ्या माजी कोचसाठी कपिल देव यांच्यासह अनेक खेळाडू एकवटले; BCCI कडे विनंती

Pranali Kodre

Kapil Dev request to BCCI: भारताचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) त्यांच्या माजी संघसहकारी अंशुमन गायकवाड यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक गायकवाड हे सध्या रक्ताच्या कर्करोगाचा सामना करत आहेत. ७१ वर्षीय गायकवाड यांच्यावर लंडनमधील किंग्स कॉलेज हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

कपिल देव यांनी असंही सांगितलं की माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि किर्ती आझाद हे देखील गायकवाड यांच्या उपचारासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कपिल देव स्पोर्ट्सस्टारशी बोलताना म्हणाले, 'हे खूप निराशाजनक आहे. मला वाईट वाटतंय कारण मी अंशूबरोबर खेळलोय आणि मी त्याला या स्थितीत पाहू शकत नाहीये. मला माहितीये की बोर्ड त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरही सक्ती करत नाही. अंशूसाठी कोणतीही मदत मनापासून आली पाहिजे.'

'तो आक्रमक वेगवान गोलंदाजांचा सामना करताना चेंडू त्याच्या तोंडावर आणि छातीवर घ्यायचा. आता त्याच्यासाठी उभं राहण्याची आपली वेळ आहे. मला खात्री आहे क्रिकेट चाहते त्याला निराश करणार नाही आणि तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतील.'

याशिवाय कपिल देव यांनी अंशुमनसारख्या प्रकरणात मदत मिळण्यासाठी सिस्टिममध्ये काही कमी असल्याचेही म्हटले.

ते म्हणाले, 'दुर्दैवाने आपल्याकडे तशी सिस्टिम नाही. या पिढीचे खेळाडू चांगले पैसे मिळवतात, ही चांगली गोष्ट आहे. सध्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही चांगले पैसे मिळतात. आमच्यावेळी बोर्डाकडे फार पैसे नव्हते. पण आता आहेत आणि त्यांनी वरिष्ठ खेळाडूंचीही काळजी घ्यायला पाहिजे.'

'जर एक ट्रस्ट तयार केली आणि त्यांनी त्यात पैसे टाकले, मात्र आपल्याकडे तशी सिस्टीम नाही. पण हे बीसीसीआय करू शकते. ते आजी-माजी खेळाडूंची काळजी घेऊ शकतात. जर कुटुंबाने आम्हाला परवानगी दिली, तर आम्ही आमची पेन्शनची रक्कमचे दान करून योगदान देण्याच तयार आहोत.'

अंशुमन गायकवाड हे १९९७ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी ४० कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतकांसह १९८५ धावा केल्या आहेत. तसेच ते १५ वनडे सामने खेळले असून त्यांनी एका अर्धशतकासह २६९ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2025: मोदी 3.0च्या बजेटची तयारी सुरू; निर्मला सीतारामन करणार ऐतिहासिक विक्रम, कोणत्या मुद्द्यांवर देणार भर?

'धनगरांनी शेळ्या-मेंढ्या राखायचं बंद केलं, तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल' पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

Bigg Boss Marathi 5 : अभिजीत विनर तर सूरज बाहेर ! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या स्क्रिनशॉटचं सत्य काय ? घ्या जाणून

Dharmajagran Yatra: अजितदादांमुळे शिंदे लागले कामाला, काढणार ‘मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा’

Chess Olympiad सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचं रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रेशन, 'रोबो वॉक' करत उंचावली ट्रॉफी, पाहा Video

SCROLL FOR NEXT