Kieron Pollard heart-warming gesture to a Fan: अमेरिकेत सध्या मेजर लीग क्रिकेट २०२४ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी (२१ जुलै) एमआय न्यूयॉर्क संघाने लॉस अँजेल्स नाईट रायडर्सला ४ विकेट्सने पराभूत करत प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. न्यूयॉर्कच्या या विजयात कर्णधार कायरन पोलार्डचा मोलाचा वाटा राहिला.
लॉस अँजेल्सने दिलेल्या १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्युयॉर्कने अवघ्या १७ षटकात ६ विकेट्स गमावत केला. या सामन्यात कर्मधार पोलार्डने १२ चेंडूत ३३ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले.
दरम्यान, त्याने हे तिन्ही षटकार १५ व्या षटकात स्पेन्सर जॉन्सनच्या गोलंदाजीवर मारले. पण यातील त्याच्या तिसऱ्या षटकाराने एका महिला चाहतीला जखमी केले.
त्याने या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा तिसरा षटकार मारला. त्या मिड-विकेटच्या दिशेने मैदानाबाहेर शॉट खेळला. त्यावेळी षटकार गेलेला हा चेंडू स्टँडमध्ये असलेल्या एका एमआय न्युयॉर्कच्याच महिला चाहतीच्या खांद्याला लागला. तो चेंडू लागताच ती महिला चाहती वेदनेने कळवळली होती.
दरम्यान, सामन्यानंतर पोलार्डने खिलाडूवृत्ती दाखवली आणि तो निकोलस पूरनसह त्या चाहतीला भेटायला गेला. यावेळी त्याने तिची माफी मागितली आणि तिला स्वाक्षरीही दिली. त्यानंतर त्या महिला चाहतीबरोबर असणाऱ्या व्यक्तीने पोलार्डसह सेल्फी काढली. त्यावेळी पोलार्डने त्याला तिची काळजी घेण्यासही सांगितले. सध्या या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर लॉस अँजेल्सने १९.१ षटकात सर्वबाद १३० धावा केल्या होत्या. त्याच्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३५ धावा केल्या, तर जेसन रॉयने २७ धावा केल्या. बाकी कोणाला फार खास काही करता आले नाही. न्युयॉर्ककडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्युयॉर्ककडून पोलार्डव्यतिरिक्त निकोलस पूरनने ३५ धावांची खेळी कली, तर डेवाल्ड ब्रेविसने २७ धावा केल्या. लॉस अँजेल्सकडून सुनील नारायणने २ विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.