Rahul Dravid | Gautam Gambhir Sakal
क्रिकेट

Rahul Dravid: आदला-बदली! KKR संघात गौतम गंभीरची जागा घेणार राहुल द्रविड? मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Kolkata Knight Riders: राहुल द्रविडला कोलकाता नाईट रायडर्स संघात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.

Pranali Kodre

Rahul Dravid News: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे.

गंभीर आयपीएल २०२४ दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने विजेतेपदही जिंकले होते.

मात्र, आता गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची दाट शक्यता आहे. जर तो मुख्य प्रशिक्षक झाला, तर कोलकाता नाईट रायडर्सचे मेंटॉरचे पद त्याला सोडावे लागणार आहे. अशात द्रविडला कोलकाता संघात मोठी जबाबदारी मिळू शकते.

न्यूज १८ च्या रिपोर्ट्सनुसार अनेक आयपीएल फ्रँचायझी द्रविडला संघाशी जोडण्यासाठी उत्सुक आहेत. तो कोलकाता फ्रँचायझीच्याही रडारवर आहे. दरम्यान, अद्यापतरी कोणतीही स्पष्ट चर्चा झाली नसल्याचे समजत आहे. तसेच त्याला त्यासाठी मोठे मानधन देण्यासही कोलकाता तयार असल्याचे समजत आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर पत्रकरांशी बोलताना द्रविड गमतीने असेही म्हटला होता की यानंतर तो बेरोजगार होणार आहे.

दरम्यान, द्रविडचा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्याने अशी इच्छा व्यक्त केली होती की त्याला काही दिवस आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. अशात आता कदाचीत द्रविड दोन -तीन महिन्यांसाठी आयपीएल संघाशी जोडला जाण्याचा विचारही करू शकतो.

यापूर्वीही द्रविडने २०१२ मध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

मात्र, २०१७ नंतर त्याने दिल्ली कॅपिटल्स संघातील पदाचा राजीनामा दिला होता आणि बीसीसीआयच्या बंगळुरू मधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

त्याने यादरम्यान १९ वर्षांखालील भारतीय संघाचा आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने २०१८ साली वर्ल्ड कप जिंकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT