KL Rahul  Sakal
क्रिकेट

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Pranali Kodre

KL Rahul on his Cricket: बुधवारी (8 मे) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे. या सामन्याआधी केएल राहुलने लोकांची त्याच्याबाबतची मतं त्याने कशाप्रकारे बदलली, यावर भाष्य केले आहे.

स्टार स्पोर्स्टने 'कॅप्टन्स स्पीक' या सेगमेंटमधील केएल राहुलचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केएल राहुलने सांगितले की 'सुरुवातीच्या दिवसात मी षटकार ठोकल्यानंतर चकीत झालो होतो. मी तेव्हा वनडे किंवा टी20 मधील फारसा चांगला खेळाडू नव्हतो.'

'माझ्यावर एक ठप्पा लागलेला की मी फक्त कसोटीचा खेळाडू आहे, हा कधीही वनडे किंवा टी२० खेळू शकणार नाही, त्याच्याकडे तसे कौशल्यनही, इतकी क्षमता त्याच्याकडे नाही वैगरे. त्यातून बाहेर येऊन माझ्या क्रिकेटबद्दल लोकांची मतं बदलण्यासाठी मला बराच काळ लागला.'

केएल राहुलने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो या संघाकडून 2017 पर्यंत खेळला. त्यानंतर 2018 ते 2021 पर्यंत तो पंजाब किंग्स संघाचा भाग होता, तर 2022 पासून तो लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळत असून या संघाचा कर्णधारही आहे.

केएल राहुलला पहिल्या तीन हंगामात फार काही खास करता आले नव्हते. परंतु, 2016 चा हंगाम त्याच्यासाठी चांगला ठरला. त्याने 44 च्या सरासरीने ३९७ धावा चोपल्या. दरम्यान, हा हंगाम त्याची ओळख बदलण्यासाठी महत्त्वाचा ठरल्याचे त्याने सांगितले.

तो म्हणाला, 'साल 2016 साल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना खूप चांगले गेले. त्यानंतर लोकांनी केएल राहुल एक वनडे आणि टी20 खेळाडू देखील आहे, यादृष्टीने पाहायला सुरुवात केली, असं मला वाटतं. त्यामुळे खूप वर्षे पडद्यामागे बरीच मेहनत केल्यानंतर माझी वेळ आली होती, मी प्रकाशझोतात आलो होतो.'

दरम्यान, केएल राहुलने 2014 मध्येच कसोटी पदार्पण केले होते. पण त्याचे वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण 2016 मध्ये आयपीएलनंतर जूनमध्ये झाले. त्यानंतर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी केली.

दरम्यान असे असले, तरी त्याला आगामी टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. मात्र तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील नियमित खेळाडू आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा करणारा भारतीय खेळाडू आहे, तर सर्वात कमी डावात 4000 धावा करणारा सलामीवीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT