Match Fixing esakal
क्रिकेट

Match Fixing Video : आयपीएल प्लेअरने केले मॅच फिक्सिंगचे आरोप... बंगाल क्रिकेट बोर्डाच्या सचिवापर्यंत धागेदोरे?

Match Fixing Allegation : ज्या क्लबला फायदा झाला त्याचे कनेक्शन हे सीएबीचे सचिवांशी असल्याचं देखील बोललं जात आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Match Fixing In Bengal Club Cricket : बंगालचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये अनेक फ्रेंचायजींचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीवत्स गोस्वामीने मॅच फिक्सिंगचे आरोप करत बंगाल क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेट असोसिएशने ऑफ बंगालच्या पहिल्या डिव्हिजन लीगमध्ये दोन क्लबमधील सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा गोस्वामी केला आहे. ज्या क्लबला फायदा झाला त्याचे कनेक्शन हे सीएबीचे सचिवांशी असल्याचं देखील बोललं जात आहे.

पहिल्या डिव्हिजनमधील टाऊन क्लब आणि मोहमेडन स्पोर्टिंग या दोन नावाजलेल्या क्लबदरम्यान बुधवारी सामना झाला होता. या सामन्यातील एक व्हिडिओ शेअर करत श्रीवत्स गोस्वामीने मॅच फिक्सिंगचे आरोप केले. विकेटकिपर बॅट्समन श्रीवत्स हा 2008 च्या वर्ल्डकप विनर संघाचा सदस्य आहे.

श्रीवत्सने फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत मोहमेडन आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय व्यक्त केला. तो म्हणाला, 'हा कोलकाता क्लब क्रिकेटमधील सुपर डिव्हिजनमधल्या दोन मोठ्या संघातील सामना होता. या सामन्यात काय झालय याची कल्पना आहे का.' (Cricket News In Marathi)

'मला क्रिकेटमध्ये असं होत आहे हे पाहून स्वतःचीच लाज वाटत आहे. मला क्रिकेट आवडतं आणि मला बंगालकडून खेळणं देखील आवडतं. मात्र हा प्रकार पाहून माझ्या ह्रदयला वेदना झाल्या आहेत. क्लब क्रिकेट हे बंगाल क्रिकेटचे ह्रदय आहे. ते उद्ध्वस्त करू नका. माध्यमे आता कुठे आहेत? '

गोस्वामीने दावा केला की, मोहमेडन स्पोर्टिंगचा फलंदाज मुद्दाम बाद झाला ज्यामुळे टाऊन क्लबला पॉईंट्स मिळतील. या क्लबचे कनेक्शन हे माजी क्रिकेटपटू देवव्रत दास यांच्याशी आहे. ते सध्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिव आहेत.

दरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवव्रत दास यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र अध्यक्ष स्नेहाशिष यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असोसिएशनने पंचांचा आणि सामना निरीक्षकांचा अहवाल मागवला आहे. आम्ही या प्रकरणी 2 मार्चला स्पर्धा समितीची बैठक देखील बोलावली आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT