Mayank Yadav and Nitish Kumar Reddy | Team India | IND vs BAN 1st T20I X/BCCI
क्रिकेट

IND vs BAN: मयंक, नितीशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे IPL फ्रँचायझींच्या खिशाला पडणार खड्डा; कसा ते जाणून घ्या

Pranali Kodre

IPL 2025 Retention Rule: भारत विरुद्ध बांगलादेश संघात टी२० मालिकेला रविवारी (६ ऑक्टोबर) सुरुवात झाली. ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातून भारताकडून दोन खेळाडूंचे पदार्पणही झाले.

अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज मयंक यादव यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे भारताचे ११६ आणि ११७ वे खेळाडू ठरले आहेत.

दोघांनीही आयपीएल २०२४ मध्ये केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. पण आता त्यांच्या पदार्पणामुळे आयपीएल फ्रँचायझींना मात्र मोठी रक्कम मोजावी लागू शकते, यामागील कारण म्हणजे आयपीएल २०२५ लिलावासाठी बदलले नियम.

आयपीएल २०२४ मध्ये नितीश कुमार सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला. या संघाकडून खेळताना त्याने १५ सामन्यांत ३०३ धावा केल्या होत्या, तसेच ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मयंक यादवने लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना सातत्याने ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत लक्ष्य वेधले होते. त्याने ४ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र, आता आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी फ्रँचायझींना ६ खेळाडूंना संघात कायम करण्याची किंवा लिलावात ६ राईट टू मॅच कार्ड वापरण्याची परवानगी आहे. दरम्यान, खेळाडूंना संघात कायम करण्यासाठी फ्रँचायझींला ठराविक रक्कमचीही अट घालण्यात आली आहे.

आता मयंक आणि नितीश या दोघांचंही आंतरराष्ट्रीय पदार्पण झाल्याने ते कॅप्ड खेळाडूच्या श्रेणीत येऊन बसले आहेत. त्यामुळे आता जर त्यांना त्यांच्या आयपीएल संघांनी कायम केले, तर त्यांच्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

अनकॅप्ड खेळाडूंना कायम केले, तर फ्रँचायझींना कमीत कमी ४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र, फ्रँचायझींना संघात कायम केल्या जाणाऱ्या पहिल्या तीन कॅप्ड खेळाडूंना कमीत कमी अनुक्रमे १८, १४ आणि ११ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर जर फ्रँचायझींनी आणखी दोन कॅप्ड खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

त्याचबरोबर जर लिलावात RTM वापरून फ्रँचायझींना आपल्या खेळाडूंना पुन्हा संघात घ्यायचे असेल, तर त्यांना लिलावात त्या खेळाडूला ज्या किंमतीची बोली लागलेली असेल, तेवढी किंमत द्यावी लागणार आहे.

एकूण हे नियम पाहाता, आता मयंक आणि नितीश यांच्यासाठी फ्रँचायझींना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

दरम्यान, मयंक आणि नितीश यांची पदार्पणातील कामगिरीही चांगली राहिली. मयंकने बांगलादेशच्या महमुद्दुलाहला बाद केले, तर नितीशने हार्दिक पांड्याबरोबर नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. त्याने १५ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Stock Market Crash: चार राज्यातील विधानसभेत भाजपचा पराभव झाला तर शेअर बाजाराचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

SCROLL FOR NEXT