India A vs Pakistan A Match Date and Time: पुरुषांच्या ट्वेंटी-२० इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात १९ ऑक्टोबरला हायव्होल्टेज सामना होणार आहे. पण, या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने एक निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाला ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी असल्याचा खळबळजनक खुलासा पाकिस्तान अ संघाचा कर्णधार मोहम्मद हॅरिसने केला आहे. १९ ऑक्टोबरला IND vs PAK हा सामना होणार आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान हे भारत-पाकिस्तान यांच्या गटात आहेत. या स्पर्धेसाठी भारत अ संघाचे कर्णधारपद तिलक वर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. तिलक वर्माने गेल्या काही काळात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
या सामन्यापूर्वी मोहम्म्द हॅरिसचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. त्यात तो म्हणतोय की, "आपको एक बात बताता हू, पहली दफा होगा के पाकिस्तान टीम के ड्रेसिंग रूम में भारतीय टीमपर बात करना पे पाबंदी है (मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्याची परवानगी नाही, हे असं प्रथमच होत असेल.)."
२३ वर्षीय हॅरिस हा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघासाठी देखील खेळला आहे आणि आतापर्यंत ६ वन डे आणि ९ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. तो म्हणाला की, जर ते ड्रेसिंग रुममध्ये सातत्याने फक्त भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलले तर खेळाडूंवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो. आम्हाला फक्त भारताचा विचार करण्याची गरज नाही, तर इतर संघांचाही विचार करायला हवा. मी पाकिस्तान वरिष्ठ संघात होतो, मागील वर्ल्ड कपही खेळलो होतो. त्यामुळे मानसिक दडपण निर्माण होते. तुम्ही भारताचा विचार करत आहात, आम्हाला इतर संघांचाही सामना करावा लागेल. म्हणून पाकिस्तानी संघावर सध्या ड्रेसिंग रुममध्ये भारताबद्दल बोलण्यावर बंदी आहे. आम्ही आतापर्यंत ड्रेसिंग रुममध्ये भारताबद्दल बोललो नाही. फक्त भारतच नाही तर आम्हाला इतर संघांचाही आदर केला पाहिजे".
१९ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (वेळ - संध्या. ७ वा.)
२१ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध युएई (वेळ - संध्या. ७ वा.)
२३ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध ओमान (वेळ - संध्या. ७ वा.)
२५ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना - (वेळ - दु. २.३० वा.)
२५ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना - (वेळ - संध्या. ७ वा.)
२७ ऑक्टोबर - अंतिम सामना (वेळ - संध्या. ७ वा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.