India vs Pakistan T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट

Ind vs Pak : 'टीम इंडिया समोर येताच पाकिस्तानचे मानसिक खच्चीकरण...' T20 वर्ल्ड कपपूर्वीच दिग्गजाचं मोठं वक्तव्य

India vs Pakistan T20 World Cup 2024 : आयसीसीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय संघ समोर येतो तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होत असते....

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024 : आयसीसीच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय संघ समोर येतो तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होत असते, त्यामुळे येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला हरवणे त्यांच्यासाठी कठीण असेल, असे मत पाकचा माजी कर्णधार मिसबा उल हकने व्यक्त केले.

१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वांत बहुचर्चित भारत-पाक सामना ९ जून रोजी अमेरिकेत होत आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारत-पाक यांच्यात सात सामने झाले आहेत. त्यातील केवळ एकच सामना (२०२१) पाकला जिंकता आलेला आहे.

भारतीय संघ गुणवत्तेच्या निकषावर प्रभावशील आहे. त्यांची वेगवान गोलंदाजी सक्षम असून दोन दर्जेदार फिरकी गोलंदाजही आहेत, असे मिसबाने सांगितले. अशा सक्षम भारतीय संघाची मानसिकता भेदणे पाक संघाला कठीण जाते. केवळ ऑस्ट्रेलियाचा संघ ही मानसिकता उत्तमपणे सांभाळू शकतो, असे मिसबा म्हणतो.

विराट कोहलीने पाकविरुद्धच्या अनेक सामन्यांत अफलातून खेळी केलेल्या आहेत. त्यामुळे विराट पाक संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्याच्याभोवती सध्या स्ट्राईक रेटचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला असला तरी विराट हाच पाक संघासाठी मोठे आव्हान असेल. पाक संघाविरुद्ध त्याने नेहमीच मानसिक वर्चस्व मिळवलेले आहे. अशा मोठ्या सामन्यांचे दडपण घेण्याऐवजी विराट स्फूर्ती घेऊन तडफदार खेळ करतो, अशा शब्दात मिसबाने विराटचे कौतुक केले.

२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यातील तो निर्णायक क्षण मिसबा उल हक अजूनही विसरलेला नाही. अखेरच्या चार चेंडूंत पाकला विजयासाठी सहा धावांची गरज असताना मिसबाने चेंडू उंच मारला आणि श्रीशांकने तो अचूक झेलला. तेथेच भारतीय संघ विश्वविजेता झाला होता.

२००७ मधील या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेकडे कोणताही संघ तेवढ्याच गांभीर्याने पाहत नव्हता. भारताने नवोदित खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपद दिले होते; पण भारत-पाक यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याने स्पर्धेची रंगत वाढवली होती, तेथूनच या स्पर्धेचे महत्त्व वाढले होते, असे मिसबाने सांगितले.

२००७ मधील धोनीने मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती यंदा रोहित शर्मा करेल, असा विश्वास भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केला. रोहितकडे एकट्याने विश्वकरंडक जिंकून देण्याची क्षमता आहे; परंतु ‘मी’पेक्षा ‘सर्वांनी’ योगदान दिले तर कोणतेही यश आपण मिळवू शकतो, असेही हरभजन म्हणाला.

यंदाच्या सामन्यातही विराट कोहलीचा दरारा कायम असणार आहे. एकट्याने सामना जिंकून देणारा तो फलंदाज आहे. स्ट्राईक रेट महत्त्वाचा नाही. अशा दर्जाचे खेळाडू अशा टीकांतून अधिक प्रेरणा घेऊन तडफेने खेळतात.

-मिसबा उल हक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT