Mohammad Huraira almost pulls off a stunner near boundary line Sakal
क्रिकेट

Viral Video: सूर्याची कॉपी करणं सोपं नाही! पाकिस्तानी फिल्डरची बाऊंड्री लाईनजवळ कॅच घेताना उडाली तारांबळ

Pranali Kodre

Pakistan vs England Test Video: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईनवर घेतलेला झेलची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याचा हा झेल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला होता.

कारण अटीतटीच्या त्या सामन्यात जर सूर्याने तो झेल घेतला नसता, तर कदाचीत भारतीय संघ त्या सामन्यात पराभूतही होऊ शकला असता. दरम्यान, त्या सामन्यानंतर अनेकांनी सूर्यकुमारसारखा झेल घेण्याचा प्रयत्न केला, काहींचे प्रयत्न यशस्वी ठरले, तर काहींचे अयशस्वी. याचे व्हिडिओही व्हायरल झाले.

आता असाच झेल घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या मोहम्मद हुरैराने केलेला दिसला, मात्र त्याला तो झेल घेण्यात अपयश आले. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात मुलतानला ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान कसोटी सामना झाला. या सामन्यात हुरैरा बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात होता.

सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत होता. त्यावेळी १४३ व्या षटकात पाकिस्तानकडून नसीम शाह गोलंदाजी करत होता. यावेळी पहिल्या चेंडूवर जॅमी स्मिथने डीप स्क्वे्र लेगच्या दिशेने मोठा फटका खेळला.

त्यावेळी हुरैरा त्याच्या उजवीकडे पळत आला आणि डोक्यापेक्षा जास्त उंचीवर असलेला झेल त्याने बाऊंड्री लाईनजवळ घेतला, पण त्यावेळी नियंत्रण जात असल्याने तो चेंडू त्याने हवेत फेकला. त्यानंतर त्याने बाऊंड्री लाईनबाहेर जाऊन परत मैदानात येत तो हवेत फेकलेला झेल घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काही क्षणात या गोष्टी घडत असल्याने त्याला नियंत्रण राखता आले नाही आणि त्याचा हातून चेंडू निसटला. त्यामुळे स्मिथला जीवदान मिळाले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने पहिल्या डावात १४९ षटकात सर्वबाद ५५६ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने सर्वाधिक १५१ धावांची खेळी केली, तर अब्दुल्ला शफिकने १०२ धावा आणि आघा सलमानने १०४ धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर इंग्लंडनेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. त्यांनी १५० षटकात ७ बाद ८२३ धावांवर पहिला डाव घोषित केला आणि २६७ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक ३१७ धावांची त्रिशतकी खेळी केली, तर जो रुटने २६२ धावांची द्विशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि सईम आयुब यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव ५४.५ षटकात २२० धावांवरच संपुष्टात आला. पाकिस्तानकडून आगा सलमानने ६३ धावा केल्या, तर अजमेर जामलने ५५ धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्यात झाोडपलं! दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्रेधातिरपट

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT