Mohammad Shami ESakal
क्रिकेट

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Vrushal Karmarkar

भारताचा महान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत मीडियाच्या चर्चेत आहे. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही चांगलाच ट्रेंड होत आहे. शमीच्या पुनरागमनाच्या बातम्या येत होत्या. मात्र आज अचानक शमीला नवीन दुखापत झाली असून त्याच्या पुनरागमनाला उशीर होऊ शकतो असा दावा करण्यात आला. दुखापतीमुळे मोहम्मद शमी आणखी 6 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर राहू शकतो, त्यामुळे आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे संशयास्पद आहे , दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. या बातम्या व्हायरल होत होत्या. मात्र यावर आता शमीचे वक्तव्य समोर आले आहे. दुखापतीच्या बातम्यांमुळे मोहम्मद शमीचा संतापला आहे. आपले मौन तोडत त्याने या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शमीने त्याच्या दुखापतीशी संबंधित बातमी सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, अशा निराधार अफवा कशासाठी? मी कठोर परिश्रम करत आहे आणि सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय किंवा मी बॉर्डर गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे सांगितलेले नाही. मी लोकांना विनंती करतो की, अनधिकृत स्त्रोतांकडून येणाऱ्या अशा बातम्यांकडे लक्ष देणे थांबवावे. कृपया थांबवा आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नका, विशेषतः माझ्या विधानाशिवाय.

मीडिया रिपोर्ट्समध्ये शमीबद्दल दावा करण्यात आला होता की तो बरा होत असताना जखमी झाला आहे. घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर मोहम्मद शमीचे पुनरागमन सुरू होते. तो नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये परतण्याची तयारी करत होता, पण त्याच दरम्यान बातमी आली की एनसीएमध्ये सराव करताना शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. ज्यामुळे तो मैदानाबाहेर असेल. तो 8 आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाहीत. पण शमीने आता हे वृत्त निराधार असल्याचे वक्तव्य केले आहे. याचाच अर्थ तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

34 वर्षीय मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली होती. विश्वचषकादरम्यान तो दुखापतीशी झुंजत असला तरीही तो केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज होता. तीव्र वेदना असूनही तो पेन किलर घेऊन खेळत होता आणि विश्वचषक संपल्यानंतर शमीवर परदेशात शस्त्रक्रिया झाली आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Baramati: शाळा महाविद्यालयांबाहेर वावरणा-या शालाबाह्य मुलांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT