Mohammad Shami  Sakal
क्रिकेट

Mohammad Shami: 'त्या' रात्री शमी १९ व्या मजल्यावरून उडी मारून जीव देणार होता; मित्राचा खळबळजनक खुलासा

Pranali Kodre

Mohammad Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या बराच चर्चेत आहे. शमी सध्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून लवकरच भारतीय संघाकडून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

पण याचदरम्यान आता त्याच्या एका मित्राने त्याच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मित्रानं सांगितलं की एक वेळ अशी आलेली, जेव्हा शमीने त्याचे आयुष्य संपवण्याचा विचार केलेला.

३३ वर्षीय शमीच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी मोठं वादळ आलं होतं. त्याचा त्याची पत्नी हसीन जहाँसोबत घटस्फोट झाला असून तिने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचाराचेही आरोप केले होते.

इतकेच नाही, तर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केलेला. तथापि, या सर्व आरोपांमधून शमीची निर्दोष सुटका झाली होती. मात्र त्या काळात त्याला मोठा संघर्ष करावा लागला.

याबाबत त्याचा मित्र उमेश कुमारने शुभंकर मिश्राच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे.

त्याने सांगितले की 'त्यावेळी शमी प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करत होता. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिक्सिंगचे आरोप लागले आणि चौकशी समिती नेमण्यात आली, त्या रात्री तो पूर्णपणे तुटला होता.'

तो म्हणाला, मी सगळं काही सहन करू शकतो, पण आपल्या देशाशी विश्वासघात करण्याचा आरोप सहन नाही करू शकत. त्यारात्री मी साधारण पहाटे ४ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठलो आणि किचनमध्ये गेलो. तेव्हा मी त्याला बाल्कनीमध्ये उभा असलेला पाहिलं.

'आम्ही १९ व्या मजल्यावर राहत होतो. मला काय झालंय, हे लक्षात आलं. ती रात्र शमीच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी रात्र होती. त्यानंतर एकदिवस आम्ही बोलत असताना त्याला फोनवर मेसेज आला की त्याला चौकशी समितीकडून क्लिन चीट मिळाली आहे. तो त्यादिवशी इतका आनंदी होता, जसं काय त्याने वर्ल्ड कप जिंकला आहे.'

दरम्यान, या घटनांनंतर शमीने क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. तो सध्या भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने २०२३ वनडे वर्ल्डकपमध्ये खेळताना सर्वाधिक २४ विकेट्सही घेतल्या होत्या.

मात्र, त्यानंतर टाचेच्या दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून काही महिन्यांपासून दूर रहावे लागले आहे. त्याच्या टाचेवर शस्त्रक्रियाही करण्यात आली असून आता तो त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT