Mohammad Azharuddin Sakal
क्रिकेट

Mohammad Azharuddin: अझहरुद्दीन यांची ‘ईडी’कडून चौकशी, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तपासणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Mohammed Azharuddin : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी क्रिकेटपटू व काँग्रेस नेते महंमद अझहरुद्दीन यांची मंगळवारी चौकशी केली. ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत तपाससंस्थेने अझहरुद्दिन यांचा जबाब नोंदविला गेला आहे..

याप्रकरणी ‘ईडी’ने त्यांना तीन ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, अझहरुद्दीन यांनी आणखी मुदत मागितली होती. त्यानुसार, ते आज फतेह मैदान रस्त्यावरील ‘ईडी’कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.

या वेळी कायदेशीर सल्लागारही सोबत होते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) मधील कथित अनियमिततेप्रकरणी ही चौकशी केली. या संघटनेत गैरव्यवहार झाल्याने याप्रकरणी ‘ईडी’ने गेल्या वर्षी छापे टाकले होते. दरम्यान, चौकशीवर अझहरुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील सुमारे २० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन एफआयआर व आरोपपत्र दाखल केले. अझहरुद्दीन एचसीएचे अध्यक्ष असतानाची त्यांची भूमिका ‘ईडी’कडून तपासली जात आहे.

अझरुद्दीन गेल्या काही वर्षांपासून हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळत आहे. अझरुद्दीन भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. ते तीन वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारे एकमेव कर्णधार आहेत.

अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४५.०३ च्या सरासरीने २२ शतकांसह ६२१५ धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी ३३४ वनडे सामन्यांमध्ये ३६.९२ च्या सरासरीने ७ शतकांसह ९३७८ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

IND vs BAN: भारताकडून दिल्लीतही बांगलादेश चीतपट! कर्णधार सूर्यकुमारच्या टीमने मालिकाही घातली खिशात

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT